चेतन व्यास
वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील साखरा येथील मोक्षधाम येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू होते. यावेळी अचानक स्मशानभूमीचे छत कोसळले. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही. मात्र या घटनेने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्याप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जातं आहे. स्मशानभूमीचा छत एवढा जीर्ण झाले असतांना ग्रामपंचायत प्रशासनाच्या लक्षात का आले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातं आहे.
गावाच्या बाहेर ग्रामपंचायतीकडून स्मशानभूमी उभारण्यात येत असते. अर्थात अंत्यसंस्काराची सोय गावासाठी केली जात असते. त्यानुसार वर्धाजिल्ह्यातील साखरा ग्रामपंचायत मार्फत स्मशानभूमी उभारण्यात आली होती. मात्र हि स्मशानभूमी उभारण्यास बऱ्याच वर्षांचा कालावधी झाल्याने ती जीर्ण झाली होती. अशात अंत्यसंस्कारावेळी गर्दी जमली असतानाच स्मशानभूमीची छत कोसळल्याची घटना घडली आहे.
Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० मिळणार नाहीत; नेमकं कारण काय? वाचा सविस्तरमुखाग्नी देताच छत कोसळले
साखरा येथील अजब मारुती बुदे यांचे निधन झाले होते. निधनानंतर नातेवाईक घरी पोहोचू लागले. यानंतर मंगळवारी दुपारच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली. नातेवाईक, आप्तस्वकीय, गावकरी अंत्ययात्रेसह मोक्षधामात पोहोचले. तेथे विधिवत अंत्यसंस्काराला सुरुवात झाली. मृतदेह सरणावर ठेवून मुखाग्नी देण्यात आला. मृतदेहाला मुखाग्नी दिल्यानंतर काही वेळातच अचानक स्मशानभूमीचे छत कोसळले. यामुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, गावकऱ्यांची धावपळ सुरू झाली.
शेड दुरुस्तीची मागणी
स्मशानभूमीच्या शेडचे छत कोसळले यावेळी सर्वजण बाहेर निघालेले होते. यामुळे सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, छत जीर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतीचे लक्ष कसे गेले नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान स्मशानभूमीच्या शेडची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी साखरा येथील ग्रामस्थांनी केली आहे.