पती-पत्नी एकत्रित पद्धतीने दरमहा 53,000 रुपये गुंतवणूक केल्यास केवळ 10 वर्षांत तब्बल 1.24 कोटींचा फंड तयार होऊ शकतो.
या प्लॅनमध्ये डेट, हायब्रिड, इक्विटी म्युच्युअल फंड आणि डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीचं योग्य वाटप आहे.
शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणूक हेच या योजनेचं खरं वैशिष्ट्य आहे.
Smart Couple Investment Plan: आजच्या काळात महागाई गगनाला भिडत असताना फक्त कमाई पुरेशी नाही, तर बचत आणि गुंतवणूक दोन्हींचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. जर पती-पत्नीने ठरावीक शिस्त पाळून नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली, तर केवळ 10 वर्षांत तब्बल 1.24 कोटी रुपयांचा फंड उभा करता येऊ शकतो. इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, सर्टिफाइड वेल्थ मॅनेजर विजय माहेश्वरी यांनी यासाठीचा प्लॅन सांगितला आहे.
खर्चाचे गणित आणि बचतमहानगरांमध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांसमोर सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे कमाईतून बचत करणे. विजय माहेश्वरी यांच्या मते, जर दाम्पत्याची एकत्रित मासिक कमाईसुमारे 1.5 लाख रुपये असेल, तर त्यातील सुमारे 97 हजार रुपये घरभाडे, ईएमआय, विमा, आरोग्य खर्च आणि इतर गरजांसाठी वापरूनही जवळपास 53 हजार रुपये दरमहा बचत करता येते.
Home Loan: तुमच्या होम लोनचा EMI कमी होणार; 'या' मोठ्या बँकांनी व्याजदर केले कमी, पाहा यादी गुंतवणुकीचे नियोजनया 53 हजार रुपयांचे योग्य ठिकाणी नियोजन केल्यास मोठा फंड तयार होऊ शकतो. माहेश्वरी यांनी दिलेल्या प्लॅननुसार:
15,000 रुपये डेट म्युच्युअल फंडमध्ये
15,000 रुपये हायब्रिड फंडमध्ये
20,000 रुपये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये
3,000 रुपये डिजिटल गोल्ड किंवा सिक्युरिटी फंडमध्ये
अशा पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीतून 10 वर्षांत अनुक्रमे डेट फंडातून 27 लाख, हायब्रिड फंडातून 33 लाख, इक्विटी फंडातून 58 लाख आणि डिजिटल गोल्डमधून 6 लाख रुपये इतका फंड तयार होऊ शकतो.
HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणारया योजनेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिस्त. दरमहा ठरलेली रक्कम कुठलाही खंड न पडता गुंतवणूक करणे अत्यंत गरजेचे आहे. खर्च वाढला म्हणून गुंतवणूकथांबवली तर अंतिम उद्दिष्ट साध्य होणार नाही. माहेश्वरी यांचा सल्ला आहे की, दीर्घकालीन गुंतवणुकीत सातत्य ठेवले तरच मोठा परतावा मिळू शकतो.
FAQsप्र.1: या योजनेत किती बचत आवश्यक आहे?
उ: दरमहा सुमारे ₹53,000 गुंतवणूक करावी लागेल.
प्र.2: फंड कुठे गुंतवावा लागेल?
उ: डेट, हायब्रिड, इक्विटी म्युच्युअल फंड आणि डिजिटल गोल्डमध्ये वाटप केलं जातं.
प्र.3: किती वर्षांत मोठा फंड तयार होईल?
उ: केवळ 10 वर्षांत अंदाजे ₹1.24 कोटींचा फंड तयार होऊ शकतो.
प्र.4: यशाची गुरुकिल्ली काय आहे?
उ: दरमहा शिस्तबद्ध व सातत्यपूर्ण गुंतवणूक करणे.