-संतोष आटोळे
इंदापूर : सध्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच उजनी धरणाने यापूर्वीच शंभरी पार करीत धोकादायक पातळी गाठत आल्याने धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वेगाने वाढ करण्यात आली असून मंगळावर (ता.19) रोजी रात्री 10:30 वाजता 75 हजार क्युसेक्स ने विसर्ग करण्यात आला आहे. तसेच यामध्ये अजून वाढ केली जाण्याची शक्यता असून भीमा नदी काठच्या लोकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देणेबाबत आला.
MP Udayanraje Bhosale: उरमोडी प्रकल्प विस्ताराला केंद्राचा हिरवा कंदील: उदयनराजे भोसले; 'जल आयोगाकडून ३०४२.६७ कोटींचा निधी मंजूर'उजनी धरणात बुधवार रोजी सकाळी 6 वाजता 101.56 टक्के पेक्षा जास्त पाणी साठा झालेला आहे. तसेच सध्या पुणे जिल्हा व घाट माथा भागासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे.धरणांच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे तसेच उजनी धरणाच्या ऊर्ध्व भागातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळी मध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच दौंड येथील सरीता मापन केंद्र या ठिकाणावरून पाण्याची आवक सदयस्थितीत 27 हजार 456 क्यूसेक्स एवढी आहे व त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.
त्यानुषंगाने खबरदारी म्हणून उजनी धरणाचे पुरनियंत्रणासठी पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान व येणारी पाण्याची आवक लक्षात घेता पुरनियंत्रणासाठी मंगळवार रोजी सायंकाळी 7 वाजता उजनी धरणाच्या सांडव्यावरुन भीमा नदीमध्ये पूर नियंत्रणासाठी पहिल्या टप्प्यात 25 हजार क्यूसेक्स त्यानंतर 40 हजार क्युसेक्स, 60 हजार क्युसेक्स तर रात्री उशिरा 75 हजार क्युसेक्स इतका विसर्ग वाढवण्यात आला आहे.यामुळे नदीतील एकूण विसर्ग सांडव्यातून 75 हजार क्यूसेक्स व विदयुत गृह 1600 क्यूसेक्स असा एकूण 75 हजार 600 क्यूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक नुसार विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता आहे. तरी नदी काठांवरील गावांना व नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनी धरणातील बुधवार (ता.20) रोजी सकाळी 6 वाजताची पाणीपातळी* एकूण पाणीपातळी - 3343.62 दशलक्ष घनमीटर (118.07 टी एम सी)
* उपयुक्त साठा _ 1540.81 दशलक्ष घनमीटर (54.41 टी एम सी)
* टक्केवारी 101.56 टक्के
* उजनी धरणात होत असलेली पाण्याची आवक - 27 हजार 456 क्युसेक्स
Satara Accident: दुर्दैवी घटना! 'वेळे, जोशी विहीर अपघातात दोघे ठार'; महामार्गावर दुचाकींची मालट्रकला धडक, पत्नीचा आक्रोश उजनीतून विसर्ग -मुख्य दरवाजातून - 75 000 क्युसेक्स
वीजनिर्मिती - 1600 क्युसेक
सीना माढा बोगदा - 180 क्युसेक
दहिगाव उपसा सिंचन योजना - 80 क्युसेक
मोठा बोगदा - 400 क्यु