नोरा फतेहीसारखे फिगर बनव…3 तास आधी… पतीचा तो त्रास, पत्नीने थेट…
Tv9 Marathi August 21, 2025 01:45 AM

नोरा फतेही हिच्यासारखे दिसण्यासाठी पती पत्नीवर दबाव टाकत. फक्त दबावच नाही तर दिवसातून तीन तास व्यायाम आणि पूर्ण डाएट करायला लावत. तीन तास व्यायाम केला नाही तर थेट पत्नीचे जेवण बंद केले जायचे. काही महिने या त्रासाला कंटाळल्यानंतर पत्नीने थेट पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्यासोबत काय काय घडायचे याचा थेट पाडा वाचून दाखवला. ही घटना गाझियाबादची आहे. महिलेने सांगितले की, तिचा पती सरकारी शाळेत शारीरिक शिक्षण आहे. तो कायमच तिला तिच्या दिसण्यावरून आणि वजनावरून तो टोमणे मारत. पतीचे म्हणणे होते की, तिच्यासोबत लग्न केल्याने त्याचे संपूर्ण आयुष्य खराब झालंय.

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीसारखी सुंदर त्याला पत्नी मिळू शकली असती. मार्च 2025 मध्येच या दोघांचे लग्न झाले. लग्नात सोने, 24 लाख रूपयांची महिंद्राची गाडी, 10 लाख रूपये आणि बऱ्याच महागड्या वस्तू देण्यात आल्या होत्या. या लग्नात तब्बल 76 लाख रूपयांचा खर्च मुलीच्या आई वडिलांना आला होता. त्यानंतरही मुलाच्या घरच्यांकडून हुंड्यासाठी सतत मुलीचा छळ केला जात होता.

सासरेचे लोक तिला गाडी, जमीन घर आणि पैसा तिच्या आई वडिलांकडून आणण्यासाठी दबाव टाकत होते. हेच नाही तर पिडितेने असाही आरोप केला आहे की, तिचा पती हा इतर महिलांची अश्लील फोटो आणि व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये पाहत असत. याला तिने विरोध केल्यास तिला मारहाण करत. हेच नाही तर तू कोणाला काही सांगितले तर म्हणत तिला धमकी देखील देत.

पिडितेने पती, सासू, सासरे आणि नंनदेवर आरोप केली आहेत. हुंड्यांसाठी आपल्यावर दबाव टाकला जात होता आणि आपण हुंडा आणण्यास मनाई केली असता मारहाण केली जात. महिलेने आरोप केला की, लग्नानंतर काही दिवसांनीच ती प्रेग्नंट राहिली. ज्यावेळी ती प्रेग्नंट होती, त्यावेळी तिला जेवण दिले जात नव्हते आणि मारहाण केली जात होती. ज्यावेळी तिची तब्येत बिघडली तेव्हा तिला हॉस्पिटलमध्येही कोणी घेऊन गेले नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.