मोदी सरकारचा सामान्यांना मोठा दिलासा; 'या' वस्तूंवरील GST पूर्णपणे रद्द होणार?
Sarkarnama August 21, 2025 05:45 AM
विमा शुल्कावरील जीएसटी होणार रद्द

केंद्र सरकारने विमा शुल्कावर लागणारा 18% जीएसटी 5% किंवा शून्यावर आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे विमाधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जीएसटी 2.0 मध्ये बदल

हा बदल आगामी जीएसटी 2.0 मध्ये लागू केला जाणार आहे. विमाधारकांसह अनेक सामान्य ग्राहकांनाही याचा फायदा होईल.

जीएसटी रचनेत मोठे बदल

नवीन जीएसटी रचनेत प्रमुख कर श्रेणी फक्त 5% आणि 18% राहतील. त्याचसोबत 40% ची नवीन कर श्रेणी सुद्धा लागू होणार आहे.

40% कर श्रेणी

मद्य, तंबाखू आणि लक्झरी वस्तू या 40% कर श्रेणीत येणार आहेत, त्यामुळे या वस्तूंवरील कराचा ताण वाढणार आहे.

दैनंदिन वापराच्या वस्तू

खाद्यान्न, औषधे, वैद्यकीय उपकरणे, स्टेशनरी, शैक्षणिक साहित्य, केसांना लावण्याचे तेल, टूथब्रश यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी 0% किंवा 5% केला जाण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रॉनिक्सवर कर

टीव्ही, एअरकंडिशनर, फ्रीज यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू 18 % कर श्रेणीत राहतील, ज्यामुळे या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विशेष वस्तू

वाहने, हातमागाच्या वस्तू, शेतमाल, कापड, खते आणि हरित ऊर्जेवर आधारित उत्पादनांवर नवीन कर रचनेत विशेष लक्ष दिले जाणार आहे.

खाद्यपदार्थ आणि ज्वेलरी

खारे पदार्थ, पराठा, बन, केक यांवरील कर सुटसुटीत केला जाईल. हिरे आणि मौल्यवान खड्यांवर 0.25% आणि ज्वेलरीवर 3% कर राहील.

Next : मोदी सरकार युवकांना देणार 15,000 रुपये, पोर्टल लॉन्च; अशी करा नोंदणी!  येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.