नाशिक रोड: गणेशोत्सवानिमित्त मुंबई एलटीटी आणि नागपूर दरम्यान सहा अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. विशेष गाडी ०२१०१ ही २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत दर शुक्रवारी एलटीटी येथून ००.१५ ला सुटेल.
त्याच दिवशी नागपूर येथे १३.४० ला पोहोचेल. गाडी ०२१०२ ही २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान दर शुक्रवारी नागपूर येथून १४.३० ला सुटेल. ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे या रेल्वेला थांबे असतील.
Ganesh Chaturthi 2025: यंदा गणेश चतुर्थीला करा 'या' 10 खास गोष्टी, घरात पसरेल आनंदाची लाटयात एक वातानुकूलित द्वितीय, सहा वातानुकूलित तृतीय, नऊ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि एक द्वितीय आसन व्यवस्थेसह व सामान गार्ड ब्रेक व्हॅन असेल. अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल आणि सुपरफास्ट मेल/ एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कानुसार तिकीट आकारले जाईल.