“आता पुण्यात खडकवासलाच पाणी, वरच्या धरणातील पाणी सोडल्यामुळे पाणी वाढत चाललय. जिल्हाधिकारी, पीएमसी आयुक्त, बाकी यंत्रणा एनडीआरएफ, एसडीआरएफ यांना अलर्ट रहायला सांगितलय. काही भागात पाणी जास्त झालय, तिथे लोकांच स्थलांतर सुरु आहे. नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे खालचे पुल पाण्याखाली आहेत. तिथे रहदारी थांबवलेली आहे” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या स्थितीबद्दल बोलताना सांगितलं. “कोल्हापुरात पाण्याची पातळी वाढलेली आहे. कदाचित नद्या धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथल्या सगळ्यांना जलसंपदा विभाग, पोलीस विभाग, ज्या यंत्रणा राज्य सरकारच्यावतीने काम करतात, या सगळ्यांना सतत सूचना दिल्या जात आहेत” असं अजित पवार म्हणाले.
“सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत. वसई-विरार मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये गेलेलं आहे. स्मार्ट रोडवर असा एरिया तिथला बराचसा भाग पाण्यात गेलेला आहे. नांदेडमध्ये काही गावांना वेढा पडलेला होता. त्या गावाच्या लोकांची घर पार पडून गेलेली आहेत. आज लोक तिथे गेलेले आहेत. त्या संदर्भात एकंदरीत सर्वेकरुन, ही परिल्थिती कायम राहणार आहे का? जर कायम राहणार असेल, पुन्हा धोका येऊ नये म्हणून सुरक्षित ठिकाणी आपण स्थलांतर करतो. पुन्हा पाऊस झाला, तर लोकांना अडचण येऊ नये अशी काळजी सरकारकडून घेतली जाईल” असं अजित पवार म्हणाले.
कॅपेसिटी नसताना जास्त लोक बसल्याने अडचणी
“सगळ्या यंत्रणा तत्परनेते काम करतायत. मुंबई मोनोरेलची घटना घडली. कधीकधी एखाद्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत कॅपेसिटी नसताना जास्त लोक बसल्याने अडचणी निर्माण होतात. जी काल मोनोरेलच्या बाबतीत झाली. पण आता सकाळपासून मोनोरेल व्यवस्थित सुरु आहे. नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. त्या बसची, मोनोरेलची जेवढी कॅपेसिटी आहे तेवढी लोक बसली पाहिजेत. काही ठिकाणी आपल्याला बोटी कराव्या लागतात. बोटीची क्षमता लक्षात घेऊन तेवढे लोक बसले पाहिजेत. एकदा त्या ठिकाणी पोहोचवल की, मग दुसरी ट्रीप-तिसरी ट्रीप करता येईल” असं अजित पवार म्हणाले.
दुर्लक्ष होऊ नये याची काळजी सरकार घेतय
“नैसर्गिक संकट आहे. यावर मात करण्यासाठी अडचणीत असलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी, सुरक्षित स्थळी नेण्यासाठी जी काही खबरदारी घ्यावी लागते, त्यासाठी रात्रंदिवस लोक राबतात. दुर्लक्ष होऊ नये याची काळजी सरकार घेतय” असं अजित पवार म्हणाले.
संकट आलय, मुद्दाम कोणी केलय का?
“मोनोरेलच्या बाबतीत असा प्रसंग झाल्यानंतर त्यात राजदकरण न आणता नागरिकांना कशी मदत करता येईल, मनोरेल बंद पडली, कारण क्षमतेपेक्षा जास्त लोक होती. आतमध्ये गुदमरण्यासारखी स्थिती निर्माण झालेली. काच फोडल्यानंतर तीन ठिकाणी शिडी लावून लोकांना बाहेर काढलं. अतिशय घाबरलेले लोक होते, त्यांना आधी बाहेर काढले. संकट आलय, मुद्दाम कोणी केलय का?. जास्त लोक बसल्यामुळे असं घडलं” असं अजित पवार मोनोरेल बंद पडण्याबद्दल म्हणाले.