केळवेरोड पुर्वेस आरोग्य शिबीर व गरजवंताना ब्लॅंकेट वाटप
पालघर, ता. १९ (बातमीदार) : सिद्धीविनायक क्लिनिक, केळवे रोड व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने केळवे रोड पूर्वेतील काटीलपाडा-झांझरोली येथील समाज मंदिर हाॕलमध्ये परिसरातील नागरिकांना आरोग्य शिबिर आयोजित केले होते.
डाॕ. आर. के. शर्मा, डाॕ. अमोल जाधव, डाॕ. संजय सुरणा, डाॕ. धवल मंगेश पाटील, डाॕ. राज के. सिंग, डाॕ.प्रितीशर्मा, डाॕ.सणडा डॅगो, डाॕ.महेश साळुंके, डाॕ.हितांक्षी शर्मा या एमबीबीएस व एमडी तज्ज्ञ डाॕक्टरानी या शिबीरात सेवा दिली.
डोळ्यांच्या तपासणीत मोतीबिंदू आढळल्यानंतर रुग्णास शस्त्रक्रिया करण्यासाठी भक्ती वेंदात हाॕस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. यासोबतच मोफत चष्मा, परिसरातील मुलांना शाळोपयोगी वस्तू, गरजूंना ब्लॅंकेट वाटप करण्यात आली. जवळजवळ २५०-३०० नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला, अशी माहिती मंगेश पाटील यांनी साहित्यिक संजय पाटील मायखोपकर यांना दिली. डाॕ.मनस्विनी पाटील, अनिल पाटील, योगेश पाटील, संजय रिंजड व साईदिप मंडळ ग्रामस्थ काटिळपाडा यांनी शिबिरासाठी मदत केली.