आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्यावर दुर्लक्ष होतं आणि काही वर्षांनी त्याचा गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. कामाचा तणाव, ऑफिस, घर अनेक जबाबदाऱ्यांमध्ये महिला अडकलेल्या असतात. त्यामुळे महिला स्वतःकडे लक्ष देत नाहीत. सांगायचं झालं तर, 35 वर्षांनंतर महिलांच्या शरीरात हार्मोनल, मेटाबॉलिक आणि शारीरिक बदल होऊ लागतात. परंतु कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे महिला या बदलांकडे दुर्लक्ष करतात. कधीकधी कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे त्या वेळ काढू शकत नाहीत तर कधीकधी घरातील जबाबदाऱ्यांमुळे त्या त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. पण महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे.
35 वर्षांनंतर महिलांना उच्च रक्तदाब आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. यासाठी दर 6 महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा रक्तदाब तपासणे आवश्यक आहे. लिपिड प्रोफाइल कोलेस्ट्रॉल चाचणी: ही चाचणी शरीरातील चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी मोजते. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका किती आहे याचा अंदाज लावता येतो.
थायरॉईड फंक्शन टेस्ट (TSH, T3, T4), महिलांमध्ये थायरॉईडच्या समस्या खूप सामान्य आहेत. थकवा, वजन वाढणे किंवा कमी होणे, मूड स्विंग्स ही सर्व थायरॉईड असंतुलनाची लक्षणे असू शकतात. वर्षातून एकदा थायरॉईड टेस्ट करावी.
संपूर्ण रक्त गणना (CBC) अशक्तपणा किंवा संसर्ग शोधते. यासोबतच, 35 वर्षांनंतर व्हिटॅमिन डी आणि बी 12 ची कमतरता सामान्य होते. यामुळे हाडांमध्ये वेदना, थकवा आणि मानसिक थकवा येतो.
पॅप स्मीअर आणि एचपीव्ही चाचणी ही चाचणी दर 3 वर्षांनी एकदा करावी, यामुळे गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाची सुरुवात ओळखण्यास मदत होते. एचपीव्ही विषाणू चाचणी याच्याशी संबंधित आहे, जी कर्करोगाचे एक प्रमुख कारण आहे.
मॅमोग्राफी किंवा स्तन तपासणी जर तुमच्या कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सर कोणाला असले, तर 35 वर्षांनंतर, तुम्ही वर्षातून एकदा स्तन तपासणी आणि मॅमोग्राफी करावी. जर सुरुवातीच्या चाचणीत लक्षात आलं तर त्यावर उपचार करणं सोपं होतं.