सेबी सुलभ आयपीओ प्रस्ताव नवी दिल्ली: भारतातील भांडवली बाजाराची नियामक संस्था असलेल्या सेबीनं आयपीओ संदर्भातील नियम शिथील केले आहेत. याचा थेट फायदा रिलायन्स जिओ आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचला होऊ शकतो. नव्या नियमानुसार ज्या कंपन्यांचं आयपीओनंतरचं बाजारमूल्य 50 हजार कोटींपेक्षा अधिक असेल त्यांना त्यांच्या इक्विटीच्या 8 टक्के भागीदारी सार्वजनिक करावी लागेल. आतापर्यंत ही किमान मर्यादा 10 टक्के होती.
याशिवाय ज्या कंपन्यांचं आयपीओनंतरचं बाजारमूल्य 5 लाख कोटींपेक्षा अधिक असेल त्यांच्यासाठी सार्वजनिक शेअर धारकांची किमान ऑफर कमी करुन 2.5 टक्के करण्यात आलं आहे, यापूर्वी ही मर्यादा 5 टक्के होती.
ब्रोकरेज फर्म सिटीच्या नुसार सेबीचं हे पाऊल जिओच्या संभाव्य आयपीओवर सकारात्मक परिणाम करेल.सिटीनं म्हटलं की जिओ प्लॅटफॉर्मचं मूल्य 120 अब्ज डॉलर्स असल्याचं ग्रहित धरल्यास सध्याच्या नियमानुसार 5 टक्के सार्वजनिक ऑफर अशल्यास जिओला 6 अब्ज डॉलरचा आयपीओ आणावा लागला असता. हा भारतीय भांडवली बाजारातील सर्वात मोठा आयपीओ ठरला असता. आता नव्या प्रस्तावानुसार आता 3 अब्ज डॉलरचा आयपीओ जिओकडून आणला जाईल, हा भारतीय गुंतणूकदारांच्या क्षमतेनुसार असेल.
सेबीच्या नव्या नियमाचा फायदा एनएसईला देखील होऊ शकतो. एनएसईकडून पुढील वर्षी 50 अब्ज डॉलरपेक्षा अधिक मूल्यासह शेअर बाजारात लिस्टिंगची तयारी करत आहे. सेबीचे चेअरमन तुहिन कांत पांडेय यांनी गुरुवारी म्हटलं की बाजार नियामक एक विनियमित मंच तयार करण्याचा विचार करत आहे, जिथं आयपीओ आणणाऱ्या कंपन्या लिस्टेड होण्यापूर्वी काही बाबींवर स्पष्टीकरण दिल्यानंतर कारभार करु शकेल. ते फिक्कीच्या कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले गुंतवणूकदारांना आयपीओपूर्वी पुरेशी मिहीत नसते. त्यामुळं हा निर्णय गुंतवणुकीचा निर्णय घेण्यात फायदेशीर ठरु शकतो.
सेबीच्या नियोजनानुसार एक नवा प्री आयपीओ ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहे. त्या प्लॅटफॉर्मवरुन गुंतवणूकदारांना आयपीओच्या वाटप आणि लिस्टेड होण्याच्या तीन दिवसांच्य काळात शेअरमध्ये व्यापार करण्याची सुविधा मिळेल. हा प्लॅटफॉर्म अनियमित अशा ग्रे मार्केटची जागा घेऊ शकतो. आयपीओ पहिल्यापासून ट्रेडिंगचा आधार बनू शकतो.सेबीच्या नव्या पावलांमुळं फक्त जिओ आणि एनएसईला फायदा होणार नाही तर भारतीय शेअर बाजारात पारदर्शकता आणि स्थिरता वाढू शकते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा