उत्तर प्रदेशातील सोनभद्रमधील अनपारा पोलीस स्टेशन परिसरात एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. तिथे राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याची फेसबुकद्वारे एका मुलीशी ओळख झाली, प्रेम जडलं, नंतर त्याने तिच्याशी देवळात लग्नंही केलं. पण त्यानंतर आपल्या पतीने सोबत ठेवण्यास, नांदवण्यास नकार दिला असा आरोप विवाहित महिलेने केला आहे. न्यायाची मागणी करत ती महिला पतीच्या घराबाहेर, तिच्या सासरच्या घरासमोरच आंदोलन करत बसली. नंतर तिने पोलिस स्टेशन गाठत तक्रा नोंदवली आणि ती तिच्या माहेरी निघून गेली.
काय आहे प्रकरण ?
झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील बर्मो पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी खुशबू कुमारी हिने पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या म्हणण्यानुसार, फेसबुकवर तिची मैत्री शशी कुमारशी झाली. शशी कुमार हा एनसीएल (नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड) मध्ये कर्मचारी आहे. दोघे एकमेकांशी गप्पा मारायचे, कधीकधी व्हिडिओ कॉलही करायचे. काही महिन्यांतच त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. हे असंच चालू राहिले आणि नंतर 5 वर्षांनी दोघांनीही ग्नाचा निर्णय घेतला. मात्र ते दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने, 12 मे 2025 रोजी ते आपापल घर सोडून हजारीबागला गेले. मात्र कुटुंबियांना कळताच त्यांना पोलिसांच्या मदतीने दोघांनाही शोधून काढलं, पकडलं आणि शशी कुमारच्या कुटुंबातील सदस्यांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले.
लग्नानंतर तरूणीला माहेरी सोडलं
यानंतर, दोघांच्या संमतीने, त्यांनी पोलिस स्टेशनच्या आवारात असलेल्या शिव मंदिरात लग्न केले. त्यानंतर बर्मोच्या जरंडीह येथील बनसो मंदिरात लग्नाची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर, शशी कुमार धनबाद जिल्ह्यातील हरिहर पोलिस स्टेशन परिसरात असलेल्या त्यांच्या घरी गेला. काही दिवसांनी, पती शशी कुमार हा पत्नीना, खुशबूला तिथून एनसीएल काकरी प्रकल्पाच्या निवासी संकुलातील बी 225 क्वार्टरमध्ये घेऊन गेला. पण अवेघ काही दिवस तिथे राहिल्यानंतर, त्याने तिला तिच्या पालकांच्या घरी, माहेरी सोडलं. मात्र बरच दिवस झाल्यावरही तो तिला परत आणायला आलाच नाही आणि नंतर तर त्याने तिचा फोन उचलणंही बंद केलं.
सासरच्या घरासमोर तरूणीचं आंदोलन
नवऱ्याच्या या वागण्यामुळे पेचात पडलेल्या खुशबून कसंबसं सासर गाठलं, पण तिथे पतीचा पवित्रा पाहून तिला धक्काच बसला. तिच्या नवऱ्याने तिला सोबत ठेवण्यास, नांदवण्यास थेट नकार दिला. तिचा नवरा आणि ससरच्या लोकांनी त्या तरूणीला घरात घेण्याही नकार दिला. हे पाहून ती घाबरली, वैतागली, पण तिने हिंमत न हारता न्याय मिळवण्याचा निर्णय घेतला. अखेर ती विवाहीत महिला तिच्या सासरच्या घरासमोरच आंदोलन करायाल बसली. हे पाहून स्थानिकांची गर्दीही तिथे जमली. या सगळ्या गोष्टींची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि खूशबूला, त्या विवाहीत तरूणीला ते पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आले.
काय म्हणाले पोलिस ?
अनपारा पोलिस स्टेशनचे प्रभारी शिव प्रताप वर्मा म्हणाले की, खूशबूने तिचे पती शशी कुमार यांना फोन केला पण तो पोलिस स्टेशनला आला नाही. तिचा पती पुन्हा लग्न करणार आहे, असं लोकांनी तिला सांगितलं. या प्रकरणी तरूणीने तक्रार नोंदवली असून त्या आधारे तपास केला जात आहे असं पोलिसांनी सांगितलं.