Stock Market Opening: शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी 25,100 च्या वर, कोणते शेअर्स वाढले?
esakal August 22, 2025 12:45 AM
  • गुरुवारी शेअर बाजारात तेजीसह सुरुवात झाली; सेंसेक्स 200 अंकांनी आणि निफ्टी 50 अंकांनी वाढले.

  • NBFC, ऑटो, रिअल्टी आणि ऑइल-गॅस शेअर्समध्ये खरेदी झाली, तर FMCG, फार्मा आणि मीडिया शेअर्सवर दबाव आहे.

  • DIIs ने सलग 32व्या दिवशी खरेदी केली, मात्र FIIs ने 2,500 कोटींची विक्री केली.

  • Stock Market Opening Today: गुरुवारी (21 ऑगस्ट) भारतीय शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात झाली. सेंसेक्स 200 अंकांच्या वाढीसह उघडला, तर निफ्टीनेही 50 अंकांची झेप घेतली. बँक निफ्टी सुमारे 80 अंकांनी वर गेला.

    निफ्टीवर NBFC शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसली, तर रिअल्टी आणि ऑइल-गॅस क्षेत्रातही गुंतवणूकदारांचा कल सकारात्मक होता. ऑटो शेअर्समध्येही खरेदी दिसली; मात्र मीडिया, FMCG आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव होता.

    निफ्टीवर Bajaj Finserv, HDFC Life, SBI Life, Reliance आणि Tata Motors हे टॉप गेनर्स ठरले. तर Eternal, HUL, Tata Consumer, Nestle आणि Infosys हे टॉप लूझर्स ठरले.

    HBA Scheme: तुम्ही होम लोनचा हप्ता भरू शकत नाहीत? सरकारकडून मिळतेय 25 लाख रुपयांची मदत जागतिक संकेत संमिश्र

    अमेरिकन बाजार बुधवारी सुस्त राहिले. डाऊ जोंस दिवसभरातील नीचांकी पातळीवरून सावरून शेवटी 16 अंकांच्या वाढीसह बंद झाला. मात्र तंत्रज्ञान क्षेत्रात विक्रीचा दबाव कायम राहिल्याने नॅस्डॅक 142 अंकांनी कोसळला. फेडच्या अलीकडील बैठकीतील मिनिट्समध्ये महागाई, रोजगार आणि टॅरिफबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

    आता बाजाराचे लक्ष शुक्रवारी होणाऱ्या जॅकसन होल कॉन्फरन्सवर आहे. आशियाई बाजारांमध्ये जपानचा निक्केई 200 अंकांनी घसरला, तर गिफ्ट निफ्टीसध्या 25,100 वर सपाट व्यापार करत आहे.

    Jio Vs Airtel Plan: मोबाईल डेटासाठी जास्त पैसे मोजावे लागणार; जिओ-एअरटेलने वाढवले दर, व्होडाफोनही तयारीत कमोडिटी मार्केटमध्ये चमक

    कमोडिटी बाजारात तेजी दिसली. ब्रेंट क्रूड 1.5% वाढून 67 डॉलर्स प्रति बॅरल झाला. सोने 30 डॉलर्सच्या वाढीसह 3,400 डॉलर्स प्रति औंसवर पोहोचले, तर चांदी 1.5% वाढून 38 डॉलर्सवर गेली.

    गुंतवणूकदारांचा कल

    देशांतर्गत गुंतवणूकदारांनी(DIIs) सलग 32 व्या दिवशी खरेदी सुरू ठेवली आणि बुधवारी 1,800 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. दुसरीकडे, परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) कॅश व फ्यूचर्स मार्केटमध्ये एकूण 2,500 कोटी रुपयांची विक्री केली.

    FAQs

    Q1. आज बाजारात सर्वाधिक तेजी कोणत्या क्षेत्रात होती?
    - NBFC, ऑटो, रिअल्टी आणि ऑइल-गॅस क्षेत्रात.

    Q2. टॉप गेनर्स कोण आहेत?
    - Bajaj Finserv, HDFC Life, SBI Life, Reliance, Tata Motors.

    Q3. टॉप लूझर्स कोण आहेत?
    - Eternal, HUL, Tata Consumer, Nestle, Infosys.

    Q4. गुंतवणूकदारांचा कल कसा होता?
    - DIIs ने खरेदी केली तर FIIs ने मोठी विक्री केली.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.