Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
esakal August 21, 2025 10:45 PM
Live Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीमध्ये परभणी तालुक्यातील पेडगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्यांचे समर्थक देखील परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसत आहे.

Pune Live : उजनी धरणातून विसर्ग वाढविला, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण १०४ टक्के भरले असून उजनी धरणातून विसर्ग वाढवून १ लाख २६ हजार ६०० क्युसेक इतका करण्यात आला आहे. यामुळे पंढरपूरमध्ये पुरस्थिती निर्माण होऊ शकते,

Nashi Live : नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर,काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून गोदावरी नदीला पूर आला आहे, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Ratnagiri Live : मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहनासांठी बंद राहणार आहे, 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान हा महामार्ग बंद रहाणार आहे.

Sangli Live : कोयना आणि वारणा धरणांमधील विसर्गात घट

सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना कळविण्यात येते की, कोयना आणि वारणा धरणांमधील विसर्गात घट करण्यात आलेली आहे. कोयना धरणातून सकाळी 6.00 वाजता विसर्ग 82,100 क्यूसेक इतका करण्यात आला. तर वारणा धरणातून 15,369 क्यूसेक इतका करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी परिस्थितीवर लक्ष ठेवावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे.

Raj Thackeray Live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. नागरिकांच्या समस्याबाबत ही भेट असणार असल्याची माहिती मिळत आहे.

Pune Live : रस्त्यावर शेण टाकून अस्वच्छता पसरविल्याप्रकरणी दूधविक्रेत्यांना दंड

पुण्यातील हडपसर परिसरातील शिंदे वस्तीत म्हशींचे गोठे आहेत. त्या भागातून जाणाऱ्या रस्त्यावर शेण साठविले जात असल्याचं महापालिका प्रशासनाच्या पाहणीत आढळून आले होते. या प्रकरणी तीन दूधविक्रेत्यांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Rain Live : मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलाशय पूर्ण क्षमतेनं भरले

गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे ७ तलाव जवळपास पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. तलावांमध्ये सध्या ९५ टक्क्यांच्या वर पाणी असल्याची माहिती बीएमसीकडून देण्यात आलीय. २०२४ आणि २०२३ या वर्षांत आजच्याच दिवशी असलेल्या पाणीसाठ्याच्या तुलनेत हे प्रमाण जास्त असल्याचंही सांगण्यात आलं.

Kolhapur Rain News Live : पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने

कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणीपातळी धोका पातळीपेक्षा फक्त ३ इंच खाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. ८ राज्य मार्ग, ३४ प्रमुख जिल्हा मार्ग, १४ जिल्हा मार्ग आणि ३० ग्रामीण भागातील वाहतूक बंद झालीय. कोल्हापूर पन्हाळा मार्गावर केर्लीजवळ पाणी आल्यानं हा मार्ग बंद झाला आहे. वाहतूक वाठारमार्गे वळवण्यात आली आहे.

Sangli Rain Live Updates : कृष्णेची धोका पातळीकडे वाटचाल, शहरात सखल भागात शिरलं पाणी

सांगलीत कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली असून धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. यामुळे शहरातील सखल भागात पाणी आलं आहे. पाणी आलेल्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केलंय.

Maharashtra News Live : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची कोकणात मोर्चेबांधणी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपने कोकणात मोर्चेबांधणाला सुरुवात केलीय चिपळूणमधून प्रशांत यादव तर सिंधुदूर्गमधील युवा नेतृव विशाल परब यांचा भाजप मध्ये पक्ष प्रवेश झालाय. आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याचे संकेत देखील भाजच्या काही नेत्यांनी दिलेत त्यामुळे कोकणात भाजप वाढवण्यासाठी हे दोन्ही जिल्ह्यातील पक्ष प्रवेश महत्वाचे मानले जात आहेत विशाल परब यांनी पक्षाशी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावर पक्ष कारवाई देखील झाली होती मात्र पुन्हा ते स्वगृही परतलेत रत्नागिरीत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच जोरदार स्वागत देखील करण्यात आलय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.