भोर, ता. २० : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन विद्यार्थिनी नासाला भेट देण्यासाठी जाणार आहेत. यामध्ये धावडी शाळेतील सातवीतील आदिती राऊत आणि निगुडघर शाळेतील सहावीतील आदिती पारठे या विद्यार्थिनींचा समावेश आहे.
दोन्ही मुलींचे आई-वडील हे शेतकरी असून त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी असतात. आदिती राऊत हिला शिक्षक किरण काळेल यांनी तर आदिती पारठे हिला वर्षा खुटवड या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. याशिवाय तालुक्यातील सहावी व सातवीतील पाच विद्यार्थी इस्रोला भेट देण्यासाठी बंगळूरला जाणार आहेत. भोरचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे आदींनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
विद्यार्थी व कंसात शाळेचे नाव -
गार्गी साळेकर (जिल्हा परिषद शाळा, आपटी), श्रुतिका पाटील (शिवरे), पूनम चव्हाण (धांगवडी), विघ्नेश कुंभार (उत्रौली) वरद शेडगे (भोंगवली).
५६५७