Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय
esakal August 21, 2025 11:45 PM

थोडक्यात:

  • लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण मोबाईल अॅडिक्ट झाले आहेत आणि शॉर्ट-फॉर्म व्हिडिओजना प्राधान्य देतात.

  • रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ पाहताना मेंदूमधील Reward Pathways दारूसारख्याच वेगाने सक्रिय होतात.

  • दीर्घकाळ या सवयीमुळे लक्ष केंद्रीत करणे, स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता प्रभावित होते.

  • How Instagram Reels Affect Your Brain Like Alcohol: सध्या लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल अॅडिक्ट झाले आहेत. त्याचसोबत सद्यस्थितीमध्ये सगळ्यांचा टाइमस्पॅन कमी झाला असून लोक शॉर्ट-फॉर्म व्हिडिओजना प्राधान्य देत आहेत. या अॅडिक्शनचा अर्ध्यापेक्षा जास्त काळ हा इंन्स्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबवरील रील्स बघण्यातच घालवला जातो.

    काही संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की, शॉर्ट-फॉर्म व्हिडिओज पाहताना मेंदूतील आनंद देणारे मार्ग म्हणेजच Reward Pathways तवेढ्याच वेगाने अॅक्टिव्ह होतात जेवढ्या वेगाने दारूसारख्या नशेच्या वस्तू वापरताना होतो.

    मात्र याचा आपल्या मेंदूवर घातक परिणाम होऊ शकतो असे भारतातील न्यूरोलॉजिस्टनी सांगितले आहे. तज्ज्ञांच्या मते ही सवय निरुपद्रवी वाटली तरी दीर्घकाळात मेंदूवर गंभीर परिणाम करू शकते, ज्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, स्मरणशक्तीही बिघडू शकते.

    रील्स, शॉर्ट व्हिडिओ आणि बिंज-वॉचिंगचा मेंदूवर परिणाम

    आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर स्क्रोल करणं, रील्स पाहणं किंवा शॉर्ट व्हिडिओ बघत वेळ घालवणं ही सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. पण तज्ज्ञांच्या मते ही सवय निरुपद्रवी वाटली तरी दीर्घकाळात मेंदूवर गंभीर परिणाम करू शकते.

    डोपामाईन आणि इन्स्टंट रिवॉर्ड

    आपल्या मेंदूमध्ये डोपामाईन नावाचं रसायन नेहमीच कार्यरत असतं. चमचमीत, आवडीचं आणि चांगलं अन्न खाल्लयावर, आपल्या आवडीच्या माणसांसोबत वेळ घालवणे, हवे असलेले यश मिळणे, आपला छंद जोपासणे, खेळ खेळणे, आणि आपल्या आवडीच्या गोष्टी केल्यामुळे डोपामाईन उत्सर्जित होतो आणि आपल्याला आनंद मिळतो. पण जेव्हा आपण सतत रील्स स्क्रोल करतो, तेव्हा आपण सतत नवनवीन गोष्टी पाहतो, तेव्हा मेंदूला वारंवार डोपामाईनचा शॉट मिळतो. मात्र हेच कृत्रिम पद्धतीने इन्स्टंट रिवॉर्ड मिल्ने हळूहळू व्यासनात बदलतं. यामुळे मेंदूमध्ये काही बदल होतात.

    मेंदूतील बदल

    सतत रील्स बघणे, शॉर्ट-फॉर्म व्हिडिओज पाहणे आणि बिंज वॉचिंग यामुळे मेंदूवर दीर्घकालीन आणि गंभीर परिणाम होतात.

    हिप्पोकॅम्पस

    झोपेच्या वेळी आपली आठवण आणि शिकण्याची क्षमता मजबूत होते. पण रात्री उशिरापर्यंत जागं राहून मोबाईलवर सतत स्क्रोल डोपामाईन तेव्हाही सतत उत्सर्जित होत राहते जे सहसा रात्रीच्या वेळी कमी प्रमाणात सक्रिय असते. यामुळे झोप बिघडते आणि त्याचा थेट परिणाम समरणशक्तीवर होतो.

    प्रीफ्रंटल कॉर्टेक्स

    मेंदूचा हा भाग आपल्याला निर्णय घेण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि आत्मनियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतो. पण सतत नवीन कॉन्टेटवर स्विच करणे आणि जास्त स्क्रॉलिंग करणे यामुले हा भाग थकतो आणि त्याची कार्यक्षमता कमी होऊ लागते.

    दारूच्या व्यसनाशी काय आहे संबंध?

    दारूचा प्रामुख्याने थेट मेंदूवर परिणाम होतो. मात्र याच्याच उलट डिजिटल माध्यमांच्या अतिरिक्त वापराचा परिणाम मेंदूवर हळूहळू पण धोकादायक पद्धतीने होतो. पण दोन्ही परिस्थितींमध्ये रिवॉर्ड सिस्टिमवर कब्जा केला जातो. ज्यामुळे ती व्यक्ती सतत हायपर होऊन काही ना काही नवीन पाहण्याच्या शोधात असते. यामध्ये त्या व्यक्तीचे आत्मनियंत्रण (Self Control) डगमगतो आणि दैनंदिन जीवनात नकारत्मक बदल दिसू लागतात.

    तज्ज्ञ काय सांगतात?

    तज्ज्ञांच्या मते मोबाईलचा वापर किंवा स्क्रीनटाइम मर्यादित ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी पुढील नियम महत्त्वाचे आहेत.

    • दिवसभरात जास्तीत जास्त २-३ तास स्क्रीनटाइम पुरेसा मानला जातो.

    • रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलपासून दूर राहीलं तर मेंदूला आराम मिळतो.

    • आठवड्यातील काही वेळ नो-स्क्रीन अवर ठेवणं फायद्याचं ठरतं.

    FAQs
  • शॉर्ट-फॉर्म व्हिडिओज आणि रील्स का व्यसनासारखे वाटू शकतात?
    (Why can short-form videos and Reels feel addictive?)
    शॉर्ट-फॉर्म व्हिडिओज पाहताना मेंदूमधील डोपामाइनची पातळी वाढते, जी आनंद आणि तात्काळ समाधान देते. ही प्रक्रिया दारू किंवा इतर व्यसनासारखी Reward Pathways हायजॅक करते, ज्यामुळे मेंदू सतत नवीन गोष्टी पाहण्याची इच्छा करत राहतो आणि व्यक्ती हळूहळू व्यसनात अडकू शकतो.

  • सतत रील्स पाहण्याचा मेंदूवर काय परिणाम होतो?
    (What effects does binge-watching Reels have on the brain?)
    सतत रील्स पाहणे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि हिप्पोकॅम्पसवर परिणाम करते. निर्णयक्षमता, लक्ष केंद्रित करणे, आत्मनियंत्रण कमी होते आणि स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम होतो. झोपेवरही याचा दुष्परिणाम होतो कारण रात्री डोपामाइन सतत उत्सर्जित होत राहतो.

  • हा व्यसन टाळण्यासाठी काय करता येईल?
    (How can one avoid this digital addiction?)
    तज्ज्ञांच्या मते, स्क्रीनटाइम मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. दिवसातून जास्तीत जास्त २-३ तास स्क्रीन वापरणे, रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलपासून दूर राहणे, आणि आठवड्यात काही वेळ नो-स्क्रीन अवर ठेवणे यामुळे मेंदूला आराम मिळतो आणि व्यसन टाळता येते.

  • रील्स व्यसन दारूसारखे खतरनाक का आहे?
    (Why is Reels addiction dangerous like alcohol?)
    दारू थेट मेंदूला हानी पोहोचवते, तर रील्स हळूहळू पण सतत Reward Pathways हायजॅक करून मेंदूला व्यसनासारखा बनवतात. यात आत्मनियंत्रण कमी होते, सतत नवीन गोष्टी पाहण्याची इच्छा होते आणि दैनंदिन जीवनात नकारात्मक बदल दिसू लागतात.

  • डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.