Rohit Sharma Replacement as ODI Captain : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी रोहित शर्माविषयी एक मोठे भाष्य केले आहे. सध्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे एकदिवसीय सामन्यातून कधी निवृत्ती स्वीकारतात याविषयीची चर्चा रंगली आहे. क्रिकेटमध्ये एक गट असा पण आहे, ज्याला वाटते की रोहित शर्मा याने 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळावा. तर दुसरीकडे त्याची तंदुरुस्ती आणि कामगिरी याविषयी अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. तर कैफ याने मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यानुसार, रोहित 2027 मधील विश्व चषकापर्यंत खेळत राहिल असा दावा कैफने केला आहे.
कैफचा मोठा दावा
मोहम्मद कैफ याने त्याच्या युट्यूब चॅनलवर मोठा दावा केला. त्यानुसा, रोहित शर्मा सध्या 38 वर्षांचा आहे. त्यामुळे तो ODI World Cup 2027 मध्ये खेळेल आणि निवृत्ती जाहीर करेल. टी20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर रोहितने या छोट्या फॉर्म्याटमधून निवृत्ती स्वीकारली होती. तर यंदा 7 मे रोजी त्यांनी कसोटीतून निवृत्ती स्वीकारली होती. आता तो केवळ एक दिवसीय सामन्यातच खेळत आहे.
सध्या रोहित शर्माचे वय 38 वर्षे इतके आहे. तेव्हा तो वनडे मध्ये अजून किती दिवस खेळणार असा सवाल करण्यात येत आहे. त्याची तंदुरुस्ती आणि कामगिरी याबाबतीत ही साशंकता आहे. रोहितच्या जागेवर नवीन कर्णधार कोण असेल याविषयीची चर्चा होत आहे. त्यावर कैफने मन मोकळं केलं आहे.
रोहितनंतर वनडेचा कर्णधार कोण?
मोहम्मद कैफ याच्या मते रोहितनंतर शुभमन गिल हा वनडे फॉर्म्याटसाठी कर्णधार असेल. तो सध्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. गेल्या 3 वर्षांपासून शुभमन गिल याने 2000 धावा केल्या आहेत. तो भविष्यात कर्णधार होईल. तो सध्या कसोटी संघाचा कर्णधार आणि टी20 मध्ये उपकर्णधार आहे. रोहित जेव्हा निवृत्ती घेईल. तेव्हा गिल नक्कीच कर्णधार होईल.
तर दुसरीकडे काही माध्यमं दुसराच दावा करत आहेत. त्यानुसार, BCCI श्रेयस अय्यर याला एकदिवसीय सामन्याचा कर्णधार म्हणून पाहत आहे. बीसीसीआय कसोटी आणि टी 20 संघासाठी शुभमन गिल तर अय्यर याला एकदिवसीय सामन्यांसाठी कर्णधार करण्याच्या विचारात आहे.