1 स्टार प्रवाहवर १५ सप्टेंबरपासून लपंडाव आणि नशिबवान या दोन मालिका सुरू होत आहेत.
2 लपंडाव मध्ये चेतन वडनेरे-कृतिका देव तर नशिबवान मध्ये नेहा नाईक- अजय पूरकर प्रमुख भूमिकेत.
3 थोडं तुझं थोडं माझं मालिकेला निरोप देऊन नशिबवान रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वी चेतन वडनेरे आणि कृतिका यांच्या लंपडाव मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता त्या पाठोपाठ नशिबवान ही मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लपंडाव मालिकेत चेतन वडनेरेसह कृतिका देव यांची जोडी पहायला मिळणार आहे. तसंच रुपाली भोसले देखील कृतिकाच्या आईचा अभिनय करणार आहे. या मालिकेत कृतिकाने सखीची भूमिका निभावली आहे. तर चेतन ड्रायव्हरच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ही मालिका देखील 15 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on InstagramA post shared by Star Pravah (@star_pravah)
नशीबवान ही मालिका कोठारे व्हिजन्सची निर्मिती आहे. ही मालिका येत्या 15 सप्टेंबरपासून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या मालिकेत गिरीजा नावाच्या मुलीची गोष्ट पहायला मिळणार आहे. ज्यामध्ये तिला आई वडिलांचं प्रेम मिळालं नसतं आणि घराची जबाबदारी, खडतर प्रवास हे दाखवण्यात आलय. या मालिकेत नेहा नाईक ही गिरीजाची भूमिका साकारणार आहे. अजय पूरकर हे खलनायकाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.
View this post on InstagramA post shared by Star Pravah (@star_pravah)
या दोन्ही मालिका एकाच दिवशी स्टार प्रवाहवर वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. 15 सप्टेंबरपासून लपंडाव ही मालिका दुपारी 2 वाजता तर नशीबवान ही मालिका रात्री 9 वाजता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना दोन्ही मालिकेबद्दल उत्सुकता लागली आहे.
नशीबवान ही मालिका ९ वाजता प्रसारित होणार असल्यानं 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. गेल्यावर्षी ही मालिका सुरु झाली होती. 14 महिन्यातच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
FAQs
स्टार प्रवाहवर कोणत्या दोन नव्या मालिका सुरू होत आहेत?
लपंडाव आणि नशिबवान या दोन मालिका सुरू होत आहेत.
लपंडाव मालिकेत प्रमुख भूमिका कोण करत आहेत?
चेतन वडनेरे आणि कृतिका देव प्रमुख भूमिकेत आहेत.
नशिबवान मालिकेत गिरीजाची भूमिका कोण साकारणार आहे?
नेहा नाईक गिरीजाची भूमिका करणार आहे.
नशिबवान मालिकेत खलनायक कोण आहे?
अजय पूरकर खलनायकाची भूमिका करणार आहेत.
लपंडाव मालिकेत सायली संजीव होती मुख्य भूमिकेत? तिला रिप्लेस करुन स्टार प्रवाहने घेतलं कृतिका देवला? चेतन वडनेरेनं सांगितलं खरं कारण