अजितदादांनी जबाबदारी सोपवताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर, मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीच्या विजया
Marathi August 22, 2025 12:25 PM

नवाब मलिक: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाने माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे निवडणूक व्यवस्थापनाची धुरा सोपवली आहे. ‘मुंबई निवडणूक व्यवस्थापन समिती’च्या अध्यक्षपदी नवाब मलिक यांची अलीकडेच नेमणूक करण्यात आली आहे. यानंतर नवाब मलिक पक्ष बांधणीसाठी अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे.

समीर भुजबळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मुंबई अध्यक्षपदासाठी पक्षाने थेट अध्यक्ष नेमण्याऐवजी निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली असून, नवाब मलिक यांच्यासह शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, आमदार सना मलिक, झिशान सिद्दीकी, संतोष धुवाळी, भास्कर विचारे, संजय तटकरे, राजू घुगे, महेंद्र पानसरे, अजय विचारे, अर्शद अमीर, इंद्रपाल सिंग, सुरेश भालेराव यांचा समावेश करण्यात आला आहे.

मलिकांकडून अ‍ॅक्शन प्लॅन तयार

मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा हाती सोपवल्यावर नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर आले असून व्यवस्थापन समितीच्या पहिल्याच बैठकीत संघटना बांधणी आणि महापालिकेच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मलिकांनी आता राष्ट्रवादीच्या सर्व सेलला अ‍ॅक्टिव्ह करून तळगळात पोहचण्याचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे.

मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीच्या विजयासाठी मोर्चेबांधणी

नवाब मलिकांनी विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल, महिला, विद्यार्थी, ओबीसी, सामाजिक न्याय, सहकार, असंघटित कामगार, हिंदी भाषिक, अल्पसंख्याक, झोपडपट्टी सेलच्या प्रमुखांशी बैठक घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत जिंकून आणण्यासाठी नवाब मलिक यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, गेल्या काही काळात न्यायालयीन प्रकरणांमुळे विजनवासात गेलेल्या नवाब मलिक यांना पक्षाने पुन्हा सक्रिय राजकारणात आणल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती तर दुसरीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखवून महत्त्वाची जबाबदारी दिल्याने नवाब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Monorail: अतिभारामुळे मोनोरेल काल पुन्हा रखडली; 50 प्रवाशांना उतरवले, आचार्य अत्रेनगर स्थानकाजवळ नेमकं काय घडलं?

Sadabhau Khot: माझ्या नादाला लागला तर तुमच्या xxxमध्ये नांगराचा फाळ घालीन; सदाभाऊ खोतांची जीभ घसरली, धमक्या देणाऱ्या गोरक्षकांना थेट इशारा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.