संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, ठाकरेंच्या शिवसेनेने सुदर्शन रेड्डींना पाठिंबा दिलेला आहे. आम्ही हुकूमशाहीविरोधात लढण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. मला आर्श्चय या गोष्टीचे वाटते की, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष किंवा शरद पवारांचा पक्ष तुम्ही संविधानाच्या विरोधात फोडला. आमदार खासदार 50-50 कोटींना विकत घेतले. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मतं मागत आहात. हे फक्त आमच्याकडे नाही तर देशभरात अशी मते मागितली जात आहेत.
तुमच्याकडे पूर्ण पाठिंबा असताना तुम्ही मते का मागत आहात? आणि तुम्हाला आमच्याकडे मते मागण्याचा काय अधिकार आहे? तुम्हाला भीती वाटते का तुमची मते फुटतील? डुबप्लिकेट जी शिवसेना आहे, त्यांचीही मते फुटतील असे तुम्हाला वाटते का? कारण वातावरण तसे आहे. ही उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक इतकी सहज नाहीये. दोन्ही बाजूंनी. आज मोदींकडे कागदावर बहुमत आहे. यासोबतच त्यांनी म्हटले की, राज ठाकरे यांनी जी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली त्याचे आम्ही स्वागत करतो.
राजनाथ सिंग आणि राज्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीच्या अगोदर शिष्टाचार म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली असेल आणि यादरम्यान येणाऱ्या फोनला आम्ही शिष्टाचाराच्या नजेरेने बघतो. अशा निवडणुकांमध्ये या चर्चा होत असतात. रेड्डी आंध्र प्रदेशचे उमेदवार असल्याने तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये अस्वस्थता आहे. प्रतिभा पाटलांना आम्ही मराठी म्हणून पाठिंबा त्यावेळी दिला होता. तोच प्रकार होऊ नये आणि मते फुटली जाण्याची शक्यता असल्याने भाजपामध्ये अस्वस्थता आहे.
ते महाराष्ट्राचे मतदार आहे तर त्यांनी धोतर नेसून जायला हवे होते ना…मग ते लुंगी नेसून का गेले, देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला ती चाणक्यगिरी शिकू नये, राज्यपाल हा राज्यात असतो त्यावेळी तो त्या राज्याचा प्रथम नागरिक असतो. आम्हालाही घटना माहिती आहे आणि आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक घटनेचे पालक करतो. फडणवीस आम्हाला काय सांगतात त्यांचे मूळ हे तामिळनाडू आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले.
भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विषयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, अमित शाह यांचे पुत्र हे क्रिकेटचे सूत्रधार आहेत. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रभक्तीचे ढोंग या क्रिकेटच्या सामन्यामध्ये उघडे पडले आहे. हे सामने जर महाराष्ट्रात किंवा देशात झाले असते तर आमच्या शिवसेनेने ते उधळून लावले असते. हिंमत असेल तर महाराष्ट्र किंवा देशात हे सामने घ्या. मग आम्ही तुम्हाला दाखवतो. तुमच्या दम नाही तुम्ही पळवाटा शोधता. कारण तुमचे पैसे त्यामध्ये गुंतलेले आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले.