दूध पौष्टीक असल्याने प्रत्येक घरात दूधाचा वापर केला जात असतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रोज दूध प्यायला हवे. परंतू प्रत्येक घरात एक चर्चा असते गायीचं दूध फायद्याचं कि म्हशीचे ? कोणी म्हणते की गायीचं दूध हलके आणि सहज पचणारे असते. तर काही जण म्हशीच्या दूधात खूप ताकद असते असे म्हणतात. परंतू खरे सत्य काय ? किडनी आणि पचनासाठी कोणते दूध चांगले ? तुम्ही शोधत असलेल्या प्रश्नाचे उत्तर जाणूयात…
गायीच्या दूधात फॅट आणि प्रोटीनचे प्रमाण म्हशीच्या दूधाच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे ते हलके आणि लवकरच पचते. ज्यांना एसिडीटी, गॅस वा पचनाची समस्या आहे. त्यांच्यासाठी गायीचे दूध चांगले मानले जाते. याशिवाय यात विटामिन ए आणि कॅल्शियम भरपूर असते. हाडांसाठी आणि डोळ्यांसाठी दूध पिणे चांगले असते.
म्हशीच्या दूधात फॅट आणि प्रोटीन जास्त असते. याच मुळे ते मलईदार आणि घट्ट असते. याची चव गायीच्या दूधापेक्षा वेगळी आणि मजेदार असते. परंतू हे पचायला मात्र जड असते. जे लोक जिममध्ये जातात, आणि अंगमेहनतीचे काम करतात किंवा ज्यांना बॉडीला एनर्जी आणि मसल्स बनवायचे असतील त्यासाठी जादा प्रोटीनची गरज असते. त्यांच्यासाठी म्हशीचे दूध चांगले म्हटले जाते.
सफदरजंग हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजी विभागाचे डॉ. अनुज मित्तल यांच्या मते म्हशीच्या दूधात प्रोटीन जास्त असते. आणि किडनीवर त्यामुळे लोड येऊ शकतो. खास करुन ज्यांची किडनी कमजोर आहे. दुसरीकडे गायीचे दूध हलके आणि त्यात प्रोटीन कमी असल्याने किडनीवर दबाव येत नाहीत. हेच कारण आहे की डॉक्टर किडनीच्या रुग्णांना गायीचे दूध पिण्याचा सल्ला देतात.
जर तुम्हाला दूध प्यायल्याने जडपणा, गॅस वा अपचन होत असेल तर गायीचे दूध तुमच्यासाठी चांगले आहे. हे दूध लवकर पचते आणि पोटाला जड वाटत नाही.जर तुमचे आरोग्य चांगले असेल आणि पचनाचा कोणताही त्रास नसेल तर म्हशीचे दूध देखील तुम्ही आरामात पिऊ शकता.
मग प्रश्न असा निर्माण होतो की कोणाचे दूध प्यावे. उत्तर सोपं आहे हे तुमची गरज आणि आरोग्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला हलके, सहज पचणारे दूध हवे असेल आणि तुमची किडनी कमजोर असेल तर गायीचे दूध उत्तम आहे.परंतू जर तुम्हाला ताकद असेल, एनर्जी हवी असेल आणि व्यायाम करत असाल तर म्हशीचे दूध तुमच्यासाठी चांगले आहे. दूध निवडताना केवळ स्वाद नव्हे तर तुमचे आरोग्य आणि गरज देखील ध्यानात घ्यावी असे म्हटले जाते.