Thane Pod Taxi: ठाण्यातही पॉड टॅक्सी धावणार; भाडे फक्त ३० रुपये; प्रताप सरनाईकांची घोषणा
Saam TV August 22, 2025 09:45 PM

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी

ठाण्यात लवकरच पॉड टॅक्सी धावणार

प्रताप सरनाईकांची घोषणा

५२ किमीपपर्यंत लांब आणि ६३ स्थानके असणार

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी, यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत घोषणा केली आहे.ठाण्यात पॉड टॅक्सी सुरु करण्याचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणूरक असणार आहे. हा मेट्रो नेटवर्कसाठी पूरक असणार आहे.

Mumbai-Nashik MEMU Shuttle: मुंबई-नाशिक प्रवास होणार सुसाट! वंदे भारतसारखी मेमो शटल सेवा लवकर होणार सुरु

ठाणे महानगरपालिकेच्या विकास आढावा बैठकीत प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. कायदेशीर सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ आयोजित केला जाईल.

पॉड टॅक्सीची वैशिष्ट्ये (Pod Taxi Features)

पॉड टॅक्सीचे हे जाळे ५२ किमीपपर्यंत लांब असणार आहे. यामध्ये ६३ स्थानके असतील. या पॉड टॅक्सीचे भाडे फक्त ३० रुपयांपासून सुरु असणार आहे. ही पॉड टॅक्सी परवडणारी असणार आहे. पीपीपी आधारावर प्रकल्प सुरु करण्यापूर्वी कायदेशीर मान्यता आणि इतर औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक आहे, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

Mumbai Pod Taxi: मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी धावणार, कामाचा मूहूर्त ठरला, तिकीट फक्त ३० रुपये; जाणून घ्या सर्वकाही

ठाण्यात नेहमीच वाहतूक कोंडी असते. खराब रस्ते आणि पायाभूत सुविधा नसल्यामुळे ठाण्यात अनेक समस्या आहेत. या गोष्टींवर तोडगा म्हणून अनेक प्रकल्प सुरु केले आहेत. यामध्ये मेट्रो,पॉड टॅक्सीचा समावेश आहे. पॉड टॅक्सीमुळे प्रवास खूप सोपा आणि सुसाट होणार आहे . याचसोबत पॉड टॅक्सीचे भाडे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असणार आहे.

Latur Vande Bharat Express : लातूरकरांसाठी सर्वात मोठी खुशखबर, पुणे-मुंबईसाठी धावणार वंदे भारत
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.