“महिलांशी संबंधित विविध कायदे, वेगवेगळ्या प्रकाराच्या योजना, महिलांवर होणारे अत्याचार, अशा सर्व गोष्टींवर समग्र चर्चा करुन एक त्याच्यावर कार्य योजना तयार करण्याचा प्रयत्न महिला आयोगातील विविध सदस्यांच्या अध्यक्षांच्या मआध्यातून केला जाणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी मी आलो. महाराष्ट्र शासनाच्यावतीने काय-काय उपायोजना केल्या, त्या मी आणि बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वांसमोर मांडलेल्या आहेत. या संवादातून देशभरातील महिला आयोगाच्या माध्यमातून ज्या कार्य योजना तयार होतील, त्या कार्ययोजना आम्ही महाराष्ट्रात पूर्ण करण्याचा प्रयत्न करु” असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नवीन वॉररुम बनवलीय. त्याबद्दलही त्यांनी माहिती दिली. “मुळातच आपल्याला ज्यावेळी जागतिक जिओपॉलिटिकल परिस्थितीत आपल्यासमोर काही देश त्या ठिकाणी ट्रेड चॅलेंजेस उभे करतायत. या आव्हानांच संधीमध्ये कसं परिवर्तन करायचं. याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलाय. महाराष्ट्रात आपण ठरवलय अशा प्रकारचे जे ट्रेड बॅरियर्स तयार झालेत, यातून मार्ग काढून पर्यायी बाजारपेठा कशा तयार करता येतील. इज ऑफ डुइंग बिझनेससाठी उद्योगात सुलभता आणण्यासाठी शंभर सुधारणा आम्ही करणार आहोत. आम्ही समिती बनवली आहे. वॉर रुम आम्ही तयार केलीय त्यात काय सुधारणा केली याचा आढावा घेणार आहोत” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत काय आश्वासन?
“उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मी फोन केला. मी निवेदन केलं की, महाराष्ट्राचे राज्यपाल जे मुंबईचे मतदार आहेत, त्यांना उपराष्ट्रपतीपदाचं उमेदवार बनवलं आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पक्षीय नसते. त्या निवडणुकीसाठी व्हीप नसतो. महाराष्ट्राच्या अस्मितेला आपण मानता, त्यामुळे महाराष्ट्राचा एक मतदार या देशाचा उपराष्ट्रपती बनणार आहे. त्यांना समर्थन द्या अशी विनंती मी केली. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वांशी चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ. शरद पवार म्हणाले की, विरोधी पक्षांनी एकत्र येऊन उमेदवार ठरवलाय, आम्ही त्याच्यासोबत जाऊ” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी काल ट्रॅफिकच्या समस्येसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावरही देवेंद्र फडणवीस बोलले. “राज ठाकरे काल भेटले. त्यांनी ट्रॅफिकबद्दल काही सूचना केल्या. त्याचं मी स्वागत करतो. जर, चांगल्या सूचना केल्या असतील, तर त्या लागू करण्याचा प्रयत्न करु” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.