तुम्हाला बाईक खरेदी करायची आहे का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, तुमच्यासाठी खास बाईकची माहिती आज आम्ही सांगणार आहोत. हिरोचे नवीन मॉडेल ग्राहकांसाठी मिड-लेव्हल ऑप्शन म्हणून समोर आले आहे. या व्हेरियंटमध्ये सर्वात मोठा बदल सीट डिझाइनमध्ये करण्यात आला आहे. याविषयी पुढे जाणून घ्या.
हिरो मोटोकॉर्पने 125 सीसी मोटारसायकल सेगमेंटमध्ये आपली उपस्थिती वाढवण्यासाठी ग्लॅमर एक्स नुकतीच लाँच केली आहे हीरो एक्सट्रीम 125 आर मध्ये सिंगल सीट व्हेरियंटचा पर्याय देण्यात आला आहे, ज्याची किंमत 1 लाख रुपये आहे. स्प्लिट-सीट आयबीएस व्हेरिएंट (98,425 रुपये) पेक्षा जास्त परंतु स्प्लिट-सीट एबीएस व्हेरिएंट (1.02 लाख रुपये) पेक्षा किंचित खाली. त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
125 सीसी सेगमेंटमध्ये हिरोग्लॅमर, ग्लॅमर एक्स, ग्लॅमर एक्सटेक, सुपर स्प्लेंडर एक्सटीईसी आणि एक्सट्रीम 125 आर ऑफर करते. या सर्वांमध्ये एक्सट्रीम 125 आर आपल्या स्पोर्टी डिझाइनसह वेगळी आहे. स्प्लिट-सीट सेटअप त्याच्या स्पोर्टी प्रोफाइलमध्ये भर घालतो. एक्सट्रीम 125आरची किंमत नुकत्याच लाँच झालेल्या ग्लॅमर एक्सच्या टॉप व्हेरियंटइतकीच आहे. ग्लॅमर एक्समध्ये राइड-बाय-वायर आणि क्रूझ कंट्रोल टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे, तर एक्सट्रीम 125आरमध्ये सिंगल चॅनेल एबीएस देण्यात आला आहे. हीरो एक्सट्रीम 125 आर व्हेरियंट आणि किंमत
या बाईकचे इतर व्हेरियंटही उपलब्ध आहेत. स्प्लिट सीट आयबीएस व्हेरियंटची किंमत 98,425 रुपये आणि स्प्लिट सीट एबीएस व्हेरिएंटची किंमत 1,02,000 रुपये आहे. अशा तऱ्हेने नवे मॉडेल ग्राहकांसाठी मिड लेव्हल पर्याय म्हणून समोर आले आहे. या व्हेरियंटमध्ये सर्वात मोठा बदल सीट डिझाइनमध्ये करण्यात आला आहे. आता यात तुम्हाला सिंगल सीट सेटअप मिळतो. ज्यामुळे रायडरला अधिक आराम मिळतो. पण यामुळे बाईकचा आक्रमक लूक थोडा कमी झाला आहे. कारण स्प्लिट-सीट डिझाइन अधिक स्पोर्टी दिसते.
इंजिनबद्दल बोलायचे झाले तर यात पूर्वीसारखेच 124.7 सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8,250 आरपीएमवर 11.4 बीएचपीपॉवर आणि 6,000 आरपीएमवर 10.5 एनएम टॉर्क जनरेट करते . यात 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. एकंदरीत, ज्यांना परवडणाऱ्या किंमतीत आराम हवा आहे त्यांच्यासाठी नवीन व्हेरियंट एक चांगला पर्याय आहे. सुरक्षिततेबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला सिंगल चॅनेल एबीएस, आकर्षक स्टायलिंग (स्पोर्टी टँक, एलईडी हेडलाइट्स) मिळतात.