चाकणमध्ये २६ जागांसाठी रंगणार चुरस!
esakal August 23, 2025 11:45 AM

चाकण, ता. २२ : नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी बारा प्रभाग करण्यात आलेले आहेत. या १२ प्रभागात मिळून २५ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. याव्यतिरिक्त एक नगराध्यक्ष राहणार आहे. एकूण २६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रभाग रचना, प्रभाग सीमा जाहीर केलेल्या असल्या तरी त्यावर ३१ऑगस्ट पर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत. अशी माहिती चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी दिली.
चाकण (ता. खेड) नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २०२५ पुढील काही महिन्यांत होत आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक हा सर्वाधिक ५५५८ लोकसंख्येचा आहे . इतर ११ प्रभाग साधारणपणे साडेतीन ते तीन हजार लोकसंख्येचे आहेत. प्रभाग रचनेमध्ये प्रभागाची व्याप्ती, परिसर, नगरे, सोसायट्या, प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे नमूद केलेली आहेत. प्रभागाच्या सीमा, निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या नमूद करण्यात आलेली आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये तीन सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. इतर ११ प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन असे एकूण २५ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. नगराध्यक्ष मिळून २६जागा आहेत.
....
पुर्ण

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.