Govinda Sunita Divorce: गोविंदा-सुनिताच्या घटस्फोटाच्या चर्चा, मोठ्या लेकीच्या मनात नेमकं काय? स्वतःच सर्वकाही सांगितलं
Saam TV August 24, 2025 01:45 AM

Tina Ahuja: अभिनेता गोविंदा आणि सुनीता हे लवकरत घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या कालपासून येत आहेत. आता अभिनेत्री टिना आहुजाने तिचे वडील गोविंदा आणि आई सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य करत स्पष्ट केले आहे की या सर्व केवळ अफवा आहेत. तिने यासह तिचे कुटुंब अजूनही एकत्र सुखी आहे असे सांगितले आहे.

हिंदुस्तान टाईम्ससोबत झालेल्या संवादात टिनाने सांगितले की, या सर्व अफवा आहेत". मी या गोष्टींकडे लक्ष देत नाही. मला देवाने एक सुंदर कुटुंब दिलं आहे आणि त्याबद्दल मी खूप आभारी आहे. त्या दोघांनी मला आणि यशला एकत्र चांगल्या संस्कारांसह मोठं केलं आहे. टिनाच्या या स्पष्टीकरणानंतर स्पष्ट झाले आहे की, गोविंदा आणि सुनीता यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चा अफवा आहेत.

Shikhar Dhawan: 'मेरा पिया घर आया...'; शिखर धवनच्या गर्लफ्रेंडने 'गब्बर'चे बॉलिवूड स्टाईलमध्ये केलं स्वागत, चाहते म्हणाले...

काही दिवसांपासून गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा जोर धरत होती. इतकंच नव्हे तर सुनीता यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहितीही समोर आली होती. मात्र गोविंदाच्या वकिलांनी या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं की, “घटस्फोट होणार नाही. हे सगळं जुनं प्रकरण आहे, आताच्या परिस्थितीशी याचा काहीही संबंध नाही.”

Govinda-Sunita: घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान सुनीताची नवी मुलाखत व्हायरल; म्हणाली, 'गोविंदावर माझ्याइतके कोणीही प्रेम...'
View this post on Instagram

A post shared by Tina Ahuja (@tina.ahuja)

दरम्यान, अहवालांनुसार डिसेंबर २०२४ मध्ये सुनीता आहुजाने बांद्रा फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. त्यात फसवणूक, क्रूरता या मुद्द्यांचा उल्लेख केला होता. पण या अर्जावर पुढील कारवाई झालेली नाही. गोविंदा आणि सुनीता आहुजा यांनी अनेकदा माध्यमांशी बोलताना त्यांच्या नात्यातील दृढ विश्वास आणि प्रेमाचा उल्लेख केला आहे. सुनीता यांनी तर, “तो माझ्याशिवाय राहूच शकत नाही” असं विधान करत या अफवांना पूर्णविराम दिला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.