सिंहगडावरून पडल्याने गौतम गायकवाड ५ दिवसांपासून बेपत्ता होता.
बचाव पथकाने जंगलात सतत शोधमोहीम राबवली.
अखेर तो तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ सापडला.
त्याच्या प्रकृतीबाबत सकारात्मक अपडेट समोर आलं आहे.
सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड आज अखेर सापडला. गौतम गायकवाड सायंकाळी सात वाजता किल्ले सिंहगडावरील तानाजी मालुसरे यांच्या समाधी मागील परिसरामध्ये मिळून आला. गौतम गायकवाड ५ दिवसांपासून बेपत्ता होता. बचाव पथक सतत शोध घेत होते. आज तो त्यांना मिळून आलाय. त्याच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आलीय.
गौतम गायकवाड हैदराबाद येथून आपल्या ५ मित्रासह पुणे येथे फिरायला आला होता. बुधवारी दुपारी ४:३० वाजता ते सिंहगडावर आला होते.या वेळेस सायंकाळच्या सुमारास तानाजी कड्याजवळ ते गेले होते. त्यावेळी गौतम याने लघवीला जाऊन येतो असे मित्रांना सांगितले. मात्र बऱ्याच वेळानंतरही तो परत आला नव्हता. म्हणून मित्रांनी गौतम याचा शोध घेतला असता तो सापडला आला नाही. जवळच हवा पॉइंटशेजारी त्याची चप्पल सापडली, मात्र तो दिसला नव्हता. गेल्या पाच दिवसांपासून तो बेपत्ता होता.
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट! 'मिसिंग लिंक' या दिवशी सुरू होणार, महत्त्वाची अपडेट समोरमिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सिंहगड भागात मुसळधार पाऊस असून, वाऱ्याचा वेगही जास्त होता. वाऱ्याचा व जमिनीचा अंदाज न आल्याने गौतम खोल दरीत कोसळला. त्यानंतर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामीण पोलीस कर्मचारी, स्थानिक गिर्यारोहक गौतमचा सलग पाच दिवसापासून शोध घेत आहेत.
जवळपास एक हजार फुटापर्यंत खोल दरीत उतरून आपत्ती व्यवस्थापन पथक त्याचा शोध घेत होते. आज तानाजी मालुसरे यांच्या समाधी मागील परिसरामध्ये गौतम सापडला होता. त्याने मदतीसाठी पर्यटकांना आवाज दिला होता. त्यानंतर त्या पर्यटकांनी तेथील स्थानिकांना याची माहिती दिली.
Gautam Gaikwad Missing: सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कड्यावरून गौतम गायकवाड बेपत्ता; तरूणासोबत काय घडलं? हुडी घातलेल्या व्यक्तीने वाढवलं गूढहवेली पोलिसांनीवनविभागाच्या वनसंरक्षण समितीच्या कोंढणपूर येथील उपद्रव शुल्क नाक्यावरील सीसीटीव्हीच्या फुटेज तपासल्यानंतर एक हुडीवाला व्यक्ती तेथून जाताना दिसत आहे. त्यामुळे गूढ वाढले होते. कारण गौतम गायकवाड बेपत्ता झाला होता त्यानंतर हुडीवाला व्यक्ती दिसला होता.