पिंपरी, ता. २४ ः रांची (झारखंड) येथे झालेल्या २३ वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराची आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रगती गायकवाड हिने महिलांच्या ६२ किलो वजन गटात कास्य पदक मिळवले.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष हनुमंत गावडे, सरचिटणीस संतोष माचुत्रे, कार्याध्यक्ष विशाल कलाटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कुटे, महाद्रंग वाघेरे, दिलीप बालवडकर, संदीप नेवाळे, अरुण तांबे, काळूराम कवितके, राजाभाऊ जाधव, रुपेश डोळस, सुरेश वाळुंज, संतोष चांदेरे, विजय जाचक आदींनी तिचे अभिनंदन केले.
PNE25V42763