या गावच्या नदीचं पाणी शापित; जन्माला आलेलं बाळ 4 वर्षांचं होताच त्याचे पाय…;सगळे गावकरी तसेच
Tv9 Marathi August 25, 2025 12:45 PM

भारतात किंवा महाराष्ट्रात अशी अनेक गावं आहेत ज्याच्या फार वेगवेगळ्या कथा आहेत. ज्या आजही आश्चर्याचा आणि चर्चेचा विषय ठरतात. अनेक गावांचे रहस्य हे समजण्यापलिकडे असते. असंच एक गाव आहे तिथली नदी ही शापित असल्याचं म्हटलं जातं. त्या नदीच्या पाण्याला तिथली लोकही शापित म्हणतात. कारण त्या गावावर त्यामुळेच आलं आहे एक मोठं संकट ज्याचा परिणाम आजही ते गावकरी भोगतायत.

आजही चमत्कारीची वाट पाहत आहेत.

बिहारमधील असे एक गाव जिथे गयाजी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 65 किमी अंतरावर जंगल आणि पर्वतांनी वेढलेले भोक्तौरी हे गाव आहे जिथे लोक आजही चमत्कारीची वाट पाहत आहेत. कारण पिढ्यांपिढ्या चालत आलेल्या या गोष्टीला आता तेही वैतागले आहे. त्यांनाही आता सामन्य जीवन जगायचं आहे. पण आपेल जीवन सामान्य कसे करता येईल याबद्दल त्या लोकांना आशेचा किरण दिसत नाही. जिल्ह्याच्या बांके बाजार ब्लॉक मुख्यालयापासून सुमारे 9 किमी अंतरावर, तिलैया पंचायतीच्या उत्तरेस, हडही नावाच्या नदी काठावर, भोक्तौरी नावाचे दलितांचे गाव आहे. जिथे लोक याच नदीच्या पाण्यामुळे अनेक आजारांना बळी पडत आहे.

बाळ जन्माला आलं आणि ते 4 ते 5 वर्षांनी….

गावात एखादी अनोळखी व्यक्ती आली की त्याचा चेहरा पाहून गावातील लोक आश्चर्यचकित होतात. त्यांना असे वाटू लागते की कोणीतरी त्यांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी आला आहे. येथील अर्ध्याहून अधिक बालके शरीराच्या विकृतीने ग्रस्त आहेत. असे म्हणता येईल की ते बुटक्यापणाचे बळी होत आहेत. त्यांचे बालपणापासूनच अपंगत्वाचा त्रास होत आहे. बाळ जन्माला आलं आणि ते 4 ते 5 वर्षांनी त्याच्यात या आजाराच्या खुणा दिसू लागतात. बुटक्यापणाचे आणि दिव्यांगाचे बळी पडत पडतात . भोक्तौरीमध्ये, या आजाराने ग्रस्त गावकरी म्हणतात की त्यांची मुले चार वर्षांची होताच अनेकदा त्यांना आपोआप कुबड निघतं किंवा मग त्यांचे पाय वाकडे होतात. आणि जवळपास गावातील सर्वच गावकरी अशाच स्थितीत पाहायला मिळतात.

गावकरी गावातील नदीला शापित म्हणतात

येथील गावकरी गावातील नदीला शापित म्हणतात.म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार त्या नदीच्या पाण्यामुळे गावाची ही अवस्था झाली आहे. पण तज्ञांचे म्हणणे आहे की यागावातील लोकांना होणारा आजार हा फ्लोराईडयुक्त पाणी पिण्यामुळे होत आहे. लोकांचे पाय वाकडे होतायत तसेच त्यांचे कुबड तरी निघतं.

मुले सरळ चालत नाहीत तर….

लहान मुलांच्या पायांची हाडे अशी विकृत झाली आहेत की जणू काही हाडे अनेक ठिकाणी तुटलेली, जोडलेली किंवा मुरगळलेली आहेत. ही मुले लंगडीने चालतात. ते थरथर कापत चालतात किंवा काठीच्या मदतीने चालतात. गावकरी सांगतात की 90 च्या दशकात येथील लोक गावाजवळून जाणाऱ्या हडही नदीचे पाणी पित असत तेव्हा तर असं काही नव्हतं होत. पायांची स्थितीही चांगली होती. मात्र जेव्हापासून गावात हातपंप बसवण्यात आला आणि लोकांनी त्याचे पाणी पिण्यास सुरुवात केली, तेव्हापासून लोकांमध्ये हा आजार दिसून येत आहे. या गावात सुमारे तीन-चार पिढ्या लोक राहत आहेत.

प्रत्येकाचे पाय वाकडे आहेत

गेल्या काही वर्षांत पाण्यातील फ्लोराईडची समस्या कमी झाल्याचंही म्हटलं जात आहे. कारण आता नवीन जन्मलेल्या मुलांना याचा त्रास होताना दिसत नाही. नाहीये. गावकऱ्यांनी सांगितले की आम्ही वेळोवेळी बांके बाजार रुग्णालयात जातो आणि औषधे घेतो, ज्यामुळे आम्हाला थोडा आराम मिळतो. परंतु गावात पाण्यातील फ्लोराईडची समस्या दूर करण्यासाठी अजून कोणतेही ठोस कामे झालेली नाहीत. या गावात ३० हून अधिक लोक बुटकेपणा आणि शरीरातील विकृतीने ग्रस्त आहेत. प्रत्येकाचे पाय वाकडे आहेत तर अनेकांचे कुबड निघालं आहे. प्रत्येकाची स्थिती अगदी सारखीच आहे. याशिवाय, इतर अनेक मुले देखील अपंगत्वाचे बळी आहेत.

त्यानमुळे आजही हे गाव चांगल्या उपचारांच्या, निरोगी वातावरणाच्या आणि आयुष्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे या गावातील लोक आजही चमत्कार होण्याची वाट पाहतायत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.