Latest Maharashtra News Updates : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 14 लोकांवर सुमोटोनुसार गुन्हा दाखल
esakal August 26, 2025 04:45 PM
Congress MLA : पलक्कडचे काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल यांची हकालपट्टी

कन्नूर (केरळ) : केरळमधील पलक्कडचे काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल यांना लैंगिक गैरवर्तनाच्या अनेक आरोपांनंतर सोमवारी केरळ प्रदेश काँग्रेस समितीने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरुन हकालपट्टी केली, अशी माहिती समित्रीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांनी दिली. मात्र, त्यांनी ममकूटाथिल यांच्या आमदारपदाच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी फेटाळली.

OBC leader Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 14 लोकांवर सुमोटोनुसार गुन्हा दाखल

बीडच्या गेवराईमध्ये काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यामध्ये गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राडा झाला होता आणि यामध्ये लक्ष्मण हाके यांच्या अंगावरती आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांकडून चपला फिरकवण्यात आल्या होत्या, तर हाके यांच्या समर्थकांकडून गाडीवरती उभारून दांडके दाखवण्यात आले होते आणि यानंतर पोलिसांनी सुमोटोनुसार 14 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ओबीसी नेते हाके यांचाही सहभाग आहे.

Swargate Bus Station : गणेशोत्सवानिमित्त गावाकडे जाण्यासाठी कोकणवासीयांची स्वारगेट बस स्थानकात मोठी गर्दी

पुणे : गणेशोत्सवानिमित्ताने गावाकडे जाण्यासाठी कोकणवासीयांची स्वारगेट बस स्थानकावरती मोठी गर्दी पहायला मिळाली. उद्यापासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने कोकणवासीय नागरिक आपापल्या गावी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोकणाकडे जाणाऱ्या बसमध्ये मोठी गर्दी आहे.

Ichalkaranji News : मूर्ती अंगावर पडून इचलकरंजीत एकजण गंभीर जखमी

इचलकरंजी : ट्रॉलीतून नेण्यात येत असलेली गणेशाची मूर्ती ड्रेनेज खोदाईमुळे झालेल्या खड्डेमय रस्त्यामुळे कलंडली आणि पाच जणांच्या अंगावर पडली. यामध्ये नंदकुमार रावसाहेब देसाई (वय ४९, रा. स्वामी मळा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर चार कार्यकर्तेही किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबतची नोंद आयजीएम रुग्णालयात झाली आहे.

Kolhapur Rain : पंचगंगेचे पाणी पात्रात, पातळी चार फुटांनी घटली; १९ बंधारे पाण्याखाली, ६३ मार्ग बंद

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारीही पावसाची उघडीप राहिल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत दिवसभरात तब्बल चार फूट तीन इंचांनी घट झाली. ही पातळी २५ फूट तीन इंच इतकी उतरल्याने पंचगंगेचे पाणी नदीपात्रात गेले. दिवसभरात ढगाळ वातावरण राहिले. काही काळ सूर्यदर्शनही झाले. तसेच अधूनमधून पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. अशा विचित्र वातावरणाचा अनुभव आज नागरिकांना अनुभवायला मिळाला. अद्याप १९ बंधारे पाण्याखाली आहेत. तसेच ६३ मार्गावर पाणी असल्याने ते बंद असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवापूर्वी देणार; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई : राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी देणार असल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली.

राजस्थान, हिमाचलमध्ये पावसाचा जोर; आजही मुसळधार पावसाचा अंदाज, शाळा बंद ठेवण्याचे आदेश

जयपूर : राजस्थानामध्ये जोरदार पाऊस सुरूच असून, मंगळवारी (ता. २६) राज्याच्या विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुरक्षिततेची खबरदारी म्हणून जयपूरसह इतर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय हिमाचल प्रदेशातही पावसाचा अंदाज असून राजधानी नवी दिल्लीत पावसाने हजेरी लावली.

Cotton Import : कापूस आयातीला विरोध; संयुक्त किसान मोर्चाकडून आंदोलनाची घोषणा

Latest Marathi Live Updates 26 August 2025 : केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क १९ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी हटविण्याचा अंतरिम आदेश जारी केला आहे. तसेच केंद्र सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना दिलेली झेड श्रेणीतील ‘सीआरपीएफ’ सुरक्षा मागे घेतली. राजस्थानामध्ये जोरदार पाऊस सुरूच असून, मंगळवारी (ता. २६) राज्याच्या विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुरक्षिततेची खबरदारी म्हणून जयपूरसह इतर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी सार्वजनिक करण्यासाठी दिल्ली विद्यापीठाला बाध्य केले जाऊ शकत नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड केली आहे. ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी गेवराईमध्ये सोमवारी दगडफेक केली. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.