Ashok Mama : मंगलमूर्ती मोरया! अशोक मामांनी साकारली गणपतीची सुरेख मूर्ती, VIDEO पाहून डोळ्याचं पारणं फिटेल
Saam TV August 26, 2025 04:45 PM

जगभरात गणेशोत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

'अशोक मा.मा.' मालिकेत देखील गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे.

अशोक मामांनी स्वतःच्या हातांनी गणपतीची सुरेख मूर्ती साकारली आहे.

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मालिकांमध्ये देखील गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. 'अशोक मा.मा.' (Ashok Mama) मालिकेत गरज पडली तेव्हा कुटुंबासाठी खंबीरपणे उभे राहणारे अशोक मामा आता मानसिकरित्या खचलेले आहेत आणि त्यांना सावरायचा प्रयत्न भैरवी करत आहे. पण घरातील वातावरण अजूनही तणावग्रस्त आहे. अनिशचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे, त्याचा ताण त्याच्या वागण्यात दिसू लागलाय. भीतीमुळे तो देव-देव करण्यात गुंतून जातो, ज्यामुळे त्याचे आणि भैरवीचे छोटे छोटे वाद अधिकच चिघळतात.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

'अशोक मा.मा.' मालिकेत आता गणपतीचे आगमन होणार आहे. विघ्नहर्ता गणपतीच्या आगमनाने त्याच्या आशीर्वादाने सगळी काही सुरळीत होवो हीच ईश्वर चरणी भैरवीची प्रार्थना आहे. दरम्यान, वेणूचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशोक मामा मुलांच्या मदतीने आपल्या बहिणीचा शोध घेऊ लागतो. तर दुसरीकडे याच वेळी गणेशोत्सवाचीतयारी देखील सुरू होते.

मुलांना आरत्या शिकवत असताना सोसायटीत इको-फ्रेंडली मूर्तीघ्यावी की पीओपी यावरून वाद होतो. त्यावेळी भैरवीला कळतं की, अशोक मामांना स्वतः मूर्ती बनवण्याचा जुना छंद आहे. ती मुलांच्या मदतीने त्याला पुन्हा हात मातीला लावण्यासाठी प्रोत्साहित करते आणि अखेर यावर्षीची सोसायटीची मूर्ती अशोक मामांच्या हातून घडवली जाते.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

'अशोक मा.मा.' मालिकेत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. पण विसर्जनानंतरच्या हिशोबात काही गडबड दिसते आणि संशय कुणावर जातोय यावरून पुन्हा घरात खळबळ उडते. अशोक मामांच्या बहिणीच्या शोधाचा प्रवास एका निर्णायक टप्प्याकडे जातो. त्याच वेळी अनिश आणि भैरवी यांच्यातला तणाव शिगेला पोहोचतो. त्यामुळे आता मालिकेला खूप रंजक वळण आले आहे.'अशोक मा.मा.' मालिका कलर्स मराठीवर कलर्स मराठीवर रात्री 8.30 वाजता पाहायला मिळते.

Bigg Boss 19 : बिग बॉसने पहिल्याच दिवशी दाखवला घरचा रस्ता, 'या' सदस्याचा पत्ता कट
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.