अहिल्यानगर: राज्य सरकारकडून जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेतील महिलांची तपासणी करण्यास अंगणवाडी सेविका संघटनेने नकार दिला आहे. यामुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून हे काम जवळपास ठप्प आहे. आतापर्यंत अवघ्या ४० हजार बहिणींचे अर्ज तपासून झाले आहेत. त्यातच आता जिल्हा परिषदेतील कार्यरत कर्मचारी असलेल्या ११ महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात ही चर्चा सुरू आहे.
MLA Hemant Ogle : कामे नीट करा; अन्यथा कारवाईला सामोरे जा: आमदार हेमंत ओगलेंचा अधिकाऱ्यांना इशारा; शिक्षण, आरोग्य सेवेत ढिसाळपणाया कामाला गती मिळावी, आता अन्य शासकीय यंत्रणांना या मोहीम उतरवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने चाचपणी करण्यात येत असल्याचे महिला बालकल्याण विभागाच्या सूत्रांकडून दिली. एक लाख २५ हजार लाडक्या बहिणी अपात्र आहेत. लाडक्या बहिणींची यादी महिला बालकल्याण विभागाला पाठविण्यात आली आहे. पात्र बहिणींची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मात्र, या योजनेतील हजार, पात्र-अपात्र महिलांची आहेत.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेत ८ ते १० महिन्यांचा लाभ दिल्यानंतर आता राज्य सरकारकडून पात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींची नव्याने पडताळणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात ११ लाख ५० हजारांहून अधिक महिला या योजनेत पात्र करण्यात आल्या होत्या.
दोन महिन्यांपूर्वी यातील चारचाकी वाहन नावावर असणाऱ्या २२ हजार महिलांची यादी सरकार पातळीवरून महिला बालकल्याण विभागामार्फत नगरच्या प्रादेशिक परिवहन विभागाला सादर करण्यात आली आहे. या यादीतील किती बहिणी अपात्र आहेत, याबाबत गोपनीयता ठेवण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींना दर महिन्याच्या अखेरीस किंवा सणासुदीच्या मुहूर्तावर हप्त्याचे वितरण केले जाते. त्यामुळे आता गणेशोत्सवात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर किंवा गौरी आगमनाच्या दिवशी ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित ३००० रुपयांचा हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र, या संदर्भात राज्य सरकारकडून अद्यापि कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
अपात्रतेचे कारणजिल्ह्यात तब्बल एक लाख २५ हजार बहिणी योजनेसाठी अपात्र आहेत. त्यांची यादी महिला बालकल्याणकडे पाठविण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून तपासणीस मनाई होत असल्याने यंत्रणेने दुसरा पर्याय निवडला आहे. एका घरात एकापेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेल्या बहिणींची संख्या ९० हजार आहे. मोटारमालक, आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिलांची संख्या २५ हजारांच्या घरात आहे. (२१ ते ६५ वर्षांवरील) वयोगटाच्या बाहेरील महिलेचा आकडा १८ हजार आहे. कागदपत्र तपासणीनंतर त्यांना अपात्र ठरविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Ganesh Festival २०२५:'गणरायाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज'; शहरात दोनशेहून अधिक मंडळे; घरोघरी मंगलमय वातावरण, मोठा पोलिस बंदोबस्तजिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आहे. मात्र, त्याबाबतची यादी आलेली नाही. ती आल्यानंतर तपासणी केली जाईल. जर त्यांनी लाभ घेतला असेल, तर संबंधित कर्मचाऱ्यांकडून त्या रकमेची वसुली केली जाईल, तसेच आदेशानुसार कार्यवाही केली जाईल.
- आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.