अहिल्यानगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा अंतरवली सराटी (जि. जालना) येथून आझाद मैदानाकडे (मुंबई) धडकणार आहे. जिल्ह्याच्या हद्दीमध्ये बुधवारी (ता. २७) हा मोर्चा येणार असल्याने मोर्चा मार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.
Ladki Bahin Yojana Ahilyanagar : माेठी बातमी! 'अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लाडकी बहीण योजनेचा मोह'; ११ महिलांनी लाभ घेतल्याचे आले समोर..मनोज जरांगे पाटील मोर्चासह अंतरवली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथून आझाद मैदान, मुंबई येथे जाणार आहेत. मोर्चा बुधवारी जिल्हा हद्दीतील घोटण, शेवगाव, मिरी, माका, पांढरीपूल, अहिल्यानगर बायपास मार्गे, नेप्ती चौक, आळेफाटा मार्गे शिवनेरी किल्ला (ता. जुन्नर) येथे मुक्कामी जाणार आहे. या मोर्चादरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, तसेच संबंधित मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ आहे.
या मार्गावरील वाहनाचा मोर्चामधील नागरिकांना धक्का लागून अपघात होऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोर्चाचे आगमन व निर्गमन होईपर्यंत अहिल्यानगर जिल्हा हद्दीतील घोटण, शेवगाव, मिरी, माका, पांढरीपूल, अहिल्यानगर बायपास मार्गे, नेप्ती चौक या मार्गावरील सर्व प्रकारची अवजड व मालवाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगरकडून नेवासे फाटा- पांढरीपूल - अहिल्यानगर शेंडी बायपास मार्गे इच्छित स्थळी जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना नेवासे फाटा - श्रीरामपूर - राहुरी फॅक्टरी - विळद बायपास मार्गाने जावे लागणार आहे. अहिल्यानगरकडून अहिल्यानगर एमआयडीसी- शेंडी बायपास - पांढरीपूल मार्गे इच्छित स्थळी जाणाऱ्या वाहनांना विळद बायपास - राहुरी फॅक्टरी, श्रीरामपूर - नेवासे फाटा मार्गे इच्छित स्थळी जावे लागणार आहे. शेवगावकडून मिरी-माका मार्गे पांढरीपुलाकडे येणारी सर्व प्रकारची वाहने शेवगाव-कुकाणा - नेवासे फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. तिसगावमार्गे इच्छित स्थळी जावे लागणार आहे. पांढरीपुलाकडून मिरी-माकामार्गे शेवगावकडे जाणाऱ्या वाहनांना जेऊर-कोल्हार घाट चिचोंडी या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
Ganesh Festival २०२५:'गणरायाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज'; शहरात दोनशेहून अधिक मंडळे; घरोघरी मंगलमय वातावरण, मोठा पोलिस बंदोबस्तअत्यावश्यक वाहनांना सवलत
शासकीय वाहने, मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चातील वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना हा आदेश लागू राहणार नाही.