Accident: नाशिकमध्ये अपघाताचा थरार! २ दुचाकींची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू
Saam TV August 27, 2025 01:45 AM
अजय सोनवणे, मनमाड

नाशिकमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नांदगाव-मनमाड महामार्गावर शास्त्रीनगरजवळ ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी आधी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मालेगावला हलवण्यात आले. तर अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघाताचा तपास नांदगाव पोलिस करत आहेत.

नांदगाव- मनमाड महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या महामार्गावर सतत अपघात होत असतात. आज देखील या महामार्गावर हिसवळ बुद्रुक शास्त्रीनगर फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला. दिगंबर अहिरे (३६ वर्षे राहणार- जळगाव बुद्रुक) आणि फकीर गांगुर्डे (राहणार पानेवाडी) या दोघांचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले. मधुकर सानप (राहणार -जळगाव बुद्रुक) आणि आकाश पवार (राहणार - पानेवाडी) अशी जखमींची नावं आहेत.

Passenger Boat Accident: भाऊच्या धक्क्याकडे जाणऱ्या प्रवासी बोटीचा अपघात; नेव्हीच्या स्पीड बोटची धडक

जखमींची प्रकृती गंभीर आहे. सुरूवातीला त्यांना शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना उपचारासाठी मालेगावला हलवण्यात आले. तर मृत्यू झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदगाव शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हा अपघात दुचाकीवरूनल नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याची माहिती प्रथमदर्शींनी दिली. या महामार्गावर वेग नियंत्रण ठेवावे यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Latur Accident : लातूरमध्ये हिट अँड रन; मद्यधुंद कार चालकाने महिलेला उडविले, उपचारादरम्यान मृत्यू
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.