1 अभिनेता सुमीत राघवनने मुंबईतील वाहतूक कोंडीवर व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला.
2 बांद्रा-सांताक्रूझ पुलावरील ट्राफिकचा गोंधळ दाखवत ‘कॉमन सेन्स’चा अभाव असल्याचं म्हटलं.
3 व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
मुंबई-पुण्यात अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आहे. अनेक दिवसांपासून मुंबई-पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीचा नागरिक सामना करताय. अनेक नागरिक वाहतुक कोंडीसाठी वैतागले आहेत. अनेक कलाकार मंडळी सुद्धा वाहतूक कोंडीने त्रस्त झालेत.
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मुंबईमध्ये राहतात. त्यांना अनेक वेळा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अशातच आता अभिनेता सुमीत राघवनने सोशल मीडियावर वाहतूक कोंडीबाबत मत व्यक्त केलय. सुमीतने सोशल मीडियावर वाहतूक कोंडीचा व्हिडिओ शेअर केलाय.
View this post on InstagramA post shared by Sumeet Raghvan (@sumeetraghvan)
सुमीतने या व्हिडिओमध्ये मुंबईच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचं भीषण वास्तव दाखवून दिलय. तसंच व्हिडिओच्या माध्यमातून त्याने वाहतुकीबाबत प्रश्न सुद्धा निर्माण केले आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात ट्राफिक दिसून येत आहे. तसंच यावेळी एक विक्रेता शेंगदाणे विकताना दिसत आहे. त्याबद्दल बोलताना सुमीत राघवन म्हणतो की, 'हा आता ब्रीजवर सुद्धा दिसायला लागलाय. कमाल आहे.' यावेळी व्हिडिओच्या स्क्रीनवर सावळा गोंधळ असं लिहीत म्हणत म्हणतो की, 'बांद्रावरुन सांताक्रूझच्या दिशेने उतरणारा पूल आणि त्यावरुन हे ट्राफिक एकत्र तीन प्रवाह येतात. तुम्ही तीन प्रवाह एकाच ठिकाणी आणले तर गोंधळ होणारच. हा कॉमन सेन्स असतो. करोडो रुपये खर्च करुन त्याचा फायदा काय?' असं त्याने व्हिडिओमध्ये म्हटलय. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
FAQs
सुमीत राघवनने कोणत्या विषयावर व्हिडिओ शेअर केला?
त्याने मुंबईतील वाहतूक कोंडीवर व्हिडिओ शेअर केला.
व्हिडिओत काय दाखवण्यात आलं आहे?
बांद्रा-सांताक्रूझ पुलावरील भीषण ट्राफिक कोंडी दाखवण्यात आली आहे.
व्हिडिओत सुमीत राघवनने काय म्हटलं?
करोडो रुपये खर्च होऊनही कॉमन सेन्स न वापरल्याने गोंधळ होतोय असं त्याने म्हटलं.
व्हिडिओत आणखी काय दिसलं?
पुलावर शेंगदाणे विकणारा विक्रेता देखील दिसला.
जुन्या गाण्याचा हटके अंदाज! योगिता चव्हाणचा 'रब्बा जोगी' गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल