तुम्हाला बजेटवाली इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर ही बातमी नक्की वाचा. टीव्हीएस ऑर्बिटर ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात 28 ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे. लाँचिंगनंतर ही ऑर्बिटर इलेक्ट्रिक स्कूटर टीव्हीएस आयक्यूबच्या खाली असेल, जी या ऑटो कंपनीची सर्वात यशस्वी इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
टीव्हीएस लवकरच परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच करणार आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी ‘ऑर्बिटर’ या नावाने इलेक्ट्रिक स्कूटरचा ट्रेडमार्क केला होता. आता ही देशांतर्गत टू-व्हीलर कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. टीव्हीएस ऑर्बिटर इलेक्ट्रिक स्कूटर भारतात 28 ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे. लाँचिंगनंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर टीव्हीएस आयक्यूबच्या खाली असेल, जी या ऑटो कंपनीची सर्वात यशस्वी इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
टीव्हीएस सध्या आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर रेंजची सुरुवातीची किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे, जी 1.59 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. आगामी टीव्हीएस ऑर्बिटर आयक्यूबच्या खाली ठेवला जाईल आणि त्याची किंमत अधिक परवडणारी असेल. यामुळे ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँडची नवीन एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर बनेल. याची किंमत एक लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. लाँच झाल्यानंतर टीव्हीएस ऑर्बिटर बजाज चेतक आणि ओला एस 1 एक्स सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरला टक्कर देईल.
सणासुदीच्या काळात स्कूटर करणार मोठी धमालटीव्हीएस ऑर्बिटर भारतात अशावेळी लाँच होत आहे, ज्यामुळे त्याची मागणी वाढण्यास मदत होऊ शकते. सणासुदीच्या अगदी आधी भारतीय बाजारात लाँच करण्यात येत आहे. सणासुदीचा काळ हा भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमधील वाहन निर्मात्यांसाठी विक्री वाढविण्यासाठी उत्तम काळ मानला जातो. या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या लाँचिंगमुळे टीव्हीएसला विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
कशी आहे स्कूटर जाणून घ्याटीव्हीएसने इंडोनेशियामध्ये नवीन इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिझाइनचे पेटंट देखील घेतले आहे आणि स्केचमध्ये असे दिसून आले आहे की हे एक अतिशय प्रीमियम दिसणारे मॉडेल असेल. ही एक नवीन ऑर्बिटर स्कूटर देखील असू शकते. मात्र, टीव्हीएसने अधिकृतरित्या काहीही सांगितलेले नाही. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्लीक स्टायलिंग, मोठी चाके आणि स्विंगआर्म-माउंटेड मोटर देण्यात आली आहे. यात स्लीक एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, स्क्वेअर एलईडी हेडलॅम्प्स, एलईडी टेललाइट्स, व्हिझर, ड्युअल कलर पेंट थीम आणि फ्रंट डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.