वर्धा जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार करणारे अन् आता भंडाऱ्याचं पालकत्व स्वीकारलेले पंकज भोयर कोण?
Sarkarnama August 27, 2025 02:45 PM
Bhandara Guardian Minister Pankaj Bhoyar भंडारा पालकमंत्री

महायुती सरकारने अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

BJP replaces Sanjay Sawkare with Pankaj Bhoyar as Bhandara Guardian Minister संजय सावकारे

भाजपचे नेते तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची उचलबांगडी करत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती केली.

Bhandara Guardian Minister Pankaj Bhoyar रणनीती

त्यामुळे आगामी स्थानिकच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपने नवी रणनीती आखल्याची चर्चांना उधाण आलं आहे.

Bhandara Guardian Minister Pankaj Bhoyar पंकज भोयर

याच पार्श्वभूमीवर वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करणारे आणि रात्रीत भंडाऱ्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळालेले पंकज भोयर कोण आहेत ते जाणून घेऊया.

Bhandara Guardian Minister Pankaj Bhoyar प्रवेश

पंकज भोयर यांनी 2014 मध्ये काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Bhandara Guardian Minister Pankaj Bhoyar वर्धा विधानसभा

भाजपच्या तिकिटावर त्यांनी 2014 सालची वर्धा विधानसभा लढवली आणि ते आमदार म्हणून विजयी देखील झाले.

Bhandara Guardian Minister Pankaj Bhoyar वर्चस्व

सन 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणूकीतही विजयी होत त्यांनी वर्धा विधानसभा मतदारसंघात आपलं वर्चस्व निर्माण केलं.

Bhandara Guardian Minister Pankaj Bhoyar काँग्रेस हद्दपार

सलह तीनदा काँग्रेसचा पराभव केल्यामुळे वर्धा जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार करणारा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

Bhandara Guardian Minister Pankaj Bhoyar शिक्षण

भोयर यांनी पी.एच.डी पर्यंत शिक्षण घेतलं असून त्यांच्या वर्ध्यात विविध शिक्षण संस्थांचं जाळं आहे.

ED Raids K.C Veerendra Arrest NEXT : 12 कोटींची कॅश अन् किलोंमध्ये दागिने; ईडीच्या छाप्यात घरात कोट्यवधींचं घबाड सापडलेले काँग्रेस आमदार के.सी. वीरेंद्र यांची हिस्ट्री क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.