बॉलिवूडच्या काही अशा अभिनेत्रीत आहेत ज्यांनी प्रसिद्धीच्या झोतात असतानाच फार कमी वयात जगाचा निरोप घेतला. त्यातील एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. दिव्या भारतीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती आणि आजही तिच्या निधनाबद्दल चर्चा सुरू असतात. तिचा मृत्य अपघात आहे की खूनाचा प्रयत्न याबद्दल अजूनही चर्चा सुरु आहे. अलिकडेच, चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी दिव्याची आठवण काढताना तिच्या मृत्यूच्या दिवसाबद्दल आणि तिच्यासोबत घालवलेल्या वेळेबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
5 एप्रिल 1993 ची ती रात्र
5 एप्रिल 1993 च्या रात्री, दिव्या भारती तिच्या पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या टेरेसवरून खाली पडून मरण पावली. त्यावेळी तिचे लग्न चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवालाशी झाले होते. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. तिचा मृत्यू अपघात मानला गेला. एका मुलाखतीत पहलाज निहलानी यांनी त्या रात्रीची आठवण सांगताना म्हटलं की ‘ ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला तेव्हा ती पूर्णपणे एकटी होती, त्यावेळी तिथे कोणीही नव्हते.’ त्यांनी सांगितले की त्यावेळी काय घडले हे कोणालाही कळले नाही आणि तिचे कुटुंबही तेव्हा रुग्णालयात पोहोचले नव्हते.मला कळताच मी ताबडतोब रुग्णालयात पोहोचलो.’
अचानक दिव्याने दार उघडलं आणि ती थेट माझ्या छातीवर येऊन बसली….
पहलाज निहलानी यांनी दिव्याच्या कामाच्या समर्पणाचे कौतुक केलं आहे. ते म्हणाले की, एकदा शूटिंग दरम्यान तिच्या पायात खिळा घुसला, ज्यामुळे दुसऱ्या दिवसाचे शूटिंग रद्द करण्यात आले. पण दिव्याने काम करण्याचा आग्रह धरला. निहलानी यांनी हा प्रसंग सांगताना म्हणाले, ‘रात्री 3 वाजता खिळा टोचला असला तरी, ती सकाळी 6 वाजता गाणे शूट करण्यास तयार होती.’ निहलानी यांनी तिला विश्रांती घेण्यास सांगितले होते. ते म्हणाले, ” मी आणि माझी पत्नी विश्रांती घेत होतो तेव्हा अचानक दिव्याने दार उघडलं आणि ती थेट माझ्या छातीवर येऊन बसली आणि म्हणाली उठ! तिने हे गमतीने केलं होतं.” नंतर निहलानी हसून म्हणाले, ‘माझ्या पत्नीने विचारले, ‘ही मुलगी कोण आहे?’
दिव्याला पहिल्याच भेटीत प्रोड्यूसरने दिलेलास तो सल्ला
‘शोला और शबनम’ मध्ये पहलाज निहलानी यांनी दिव्याला कसे कास्ट केले याचा किस्सागी त्यांनी सांगितला. त्यांनी सांगितले की संगीत दिग्दर्शक जतिन पंडित यांनी त्यांची दिव्याशी ओळख करून दिली होती. पहिल्या भेटीत दिव्याचे फोटो पाहून ते प्रभावित झाले नाहीत. पहलाज निहलानी म्हणाले की तिच्या फोटोंमध्ये तिचा चेहरा थोडा भरलेला म्हणजे जाडसर दिसत होता. त्यानंतर त्यांनी दिव्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. नंतर, जेव्हा जतिनने दिव्याला पुन्हा फिल्म सिटीला बोलावले तेव्हा ‘शोला और शबनम’ चे शूटिंग आधीच सुरू झाले होते. तेव्हा दिव्याने बऱ्यापैकी तिचं वजन कमी केलं होतं.