Nana Patekar Personal Life: अभिनेता नाना पाटेकर यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही नाना पाटेकर सिनेविश्वात सक्रिय आहेत. आज नाना पाटेकर अनेकांच्या प्रेरणास्थानी आहेत. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा नाना पाटेकर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होते. बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना नाना पाटेकर यांचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडण्यात आलं. ती अभिनेत्री नाना पाटेकर यांच्यापेक्षा तब्बल 20 वर्षांनी लहान होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर ब्रेकअपनंतर खुद्द नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत भावना व्यक्त केल्या होत्या.
नाना पाटेकर यांच्या सोबत ज्या अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मनिषा कोईराला आहे. तेव्हा मनिषा बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात होती. तर नाना पाटेकर हे मोठे स्टार म्हणून उदयास आले होतं. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. पण त्यांचं नातं फार काळ काही टिकलं नाही.
नाना पाटेकर यांचं लग्न झालं होत आणि त्यांना एक मुलगा देखील होता. अशा काळात नाना पाटेकर आणि मनिषा यांच्यामध्ये प्रेम बहरलं होतं. दरम्यान, एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी मनिषा कोईराला हिच्याबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. आजही नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.
नाना पाटेकर मुलाखतीत म्हणाले होते, ‘मी मनिषा स्टारर ‘ग्रहण’ सिनेमा पाहिला आहे. सिनेमात ती प्रचंड सुंदर दिसत होती. मनीषाकडे जन्मजात प्रतिभा आहे. ती सर्वात संवेदनशील अभिनेत्री आहे. ती कस्तुरी मृगासारखी आहे, तिला हे लक्षात आलं पाहिजे की तिला कोणाशीही जुळवून घेण्याची गरज नाही. तिच्याकडे सर्व काही आहे आणि ते पुरेसं आहे. जेव्हा मी पाहतो तेव्हा असं वाटतं ही स्वतःसोबत असं काय करत आहे. तेव्हा मी माझे अश्रू रोखू शकत नाही. कदाचित आज मला तिच्याबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार नाही. ती खूप सहजपणे नाराज होते. कदाचित कारण तिने तिच्या मागील नात्यांमध्ये खूप त्रास सहन केला आहे.”
मनिषा बद्दल नाना पाटेकर पुढे म्हणाले, ‘ब्रेकअप आयुष्यातील फार मोठी आणि वेदनादायी गोष्ट आहे… या वेदना समजण्यासाठी तुम्हाला त्या वेदना अनुभवाव्या लागतील… मला मनिषाची आजही आठवण येते…’ सांगायचं झालं तर, नाना पाटेकर आणि मनिषा यांच्या नात्याला आज अनेक वर्ष झाली आहेत. दोघे देखील त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत.