सलमान खान याने बाप्पाची आरती करताना असं काय केलं, ज्यामुळे भडकेल चाहते, व्हिडीओ व्हायरल
Tv9 Marathi August 28, 2025 06:45 PM

Salman Khan: गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तीमय वातावरण झालं आहे. फक्त सर्वसामान्यांच्या घरीच नाही तर, सेलिब्रिटींच्या घरी देखील गणरायाची स्थापना झाली आहे. बॉलिवूडमध्ये असं एक मुस्लिम कुटुंब आहे, जे मोठ्या भक्तीभावाने गणरायचं घरात स्वागत करतं. हे कुटुंब दुसरं तिसर कोणी नाही तर, अभिनेता सलमान खान याचं आहे. सध्या सोशल मीडियावर सलमान खान याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भाईजान कुटुंबियांसोबत बाप्पाची आरती करताना दिसत आहे.

दरवर्षी प्रमाणे सलमान खानयाने यंदाच्या वर्षी देखील जवळच्या व्यक्तींना आणि मित्रपरिवाराला गणरायाच्या दर्शनासाठी बोलावलं होतं. सलमान खान याची सर्वात लहान बहीण अर्पिता हिच्या घरी गणपतीची स्थापना करण्यात आली. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पंडित आरती म्हणताना दिसत आहे… तर अनेकांना आरतीचा मान घेतला.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खान याच्यापासून अरबाज खान आणि आई – वडील सलीम – सलमा यांच्यासोबत भाऊ – बहीण आणि जवळच्य मित्रांनी देखील बाप्पाची आरती केली. या उत्सवात श्रद्धा, प्रेम आणि कौटुंबिक बंधन स्पष्ट दिसून आलं. कुटुंबाने पुन्हा एकदा आरती थाळी धरून आणि भगवान गणेशाची पूजा करून भक्ती, श्रद्धा आणि परंपरेची भावना सुंदरपणे प्रदर्शित केली.

व्हिडीओवर अनेकांनी प्रेम व्यक्त केलं तर, अभिनेकांनी टीका केली आहे. एक नेटकरी सलमान खान याच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘मुस्लिम असण्याच्या नावावर सलमान कलंक आहे.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘फक्त नावासाठी का म्हणता मुस्लिम आहात म्हणून…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सलमान खानच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नाही…, भाईजान हे चुकीचं आहे…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘असं नाटक करणार नाही तर दुकान चालणार नाही…’

सलमान खान याचे आगामी सिनेमे

सलमान खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘बॅटल ऑफ गलवान’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान खान याच्यासोबत चित्रांगदा सिंग, जेन शॉ, अंकुर भाटिया आणि हर्षिल शाह देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.