कुडाळात सृदृढ बैल प्रदर्शनास प्रतिसाद
esakal August 29, 2025 02:45 PM

swt283.jpg
87693
नेरुर ः रणझुंजार मित्रमंडळ व रुपेश पावसकर पुरस्कृत सुदृढ बैल प्रदर्शन स्पर्धेत हाजीम मुजावर यांचा सत्कार करताना रुपेश पावसकर.

कुडाळात सृदृढ बैल प्रदर्शनास प्रतिसाद
‘रणझुंजार’चे आयोजनः समाजसेवक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः रणझुंजार मित्रमंडळ व रुपेश पावसकर पुरस्कृत सुदृढ बैल प्रदर्शन व गावातील समाजसेवा करणारे समाजसेवक तसेच विशेष कलागुण असलेल्या गावातील विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचा प्रारंभ ज्येष्ठ ग्रामस्थ दाजी राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या कार्यक्रमास सर्व पक्षीय नेत्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या बैल प्रदर्शनात प्रकाश साऊळ, आजीम मुजावर, भाई नारिंग्रेकर, विशाल नाईक, बाळा रेवंडकर, आनंद लिंगे, अवी शिरसाट, स्वप्नील नेरुरकर, बाळा नांदोस्कर, बाबी साऊळ यांनी सहभाग घेतला. रुपेश पावसकर यांनी गावात प्रथमच घेतलेला हा उपक्रम अभिमानास्पद असल्याचे देवस्थान कमिटी अध्यक्ष चारुदत्त देसाई यांनी सांगितले. या स्पर्धेस माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी या उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रकाश परब, अक्षय चव्हाण, शैलेश नाईक, राजा शृंगारे, विनायक नाईक, अमोल शृंगारे, विलास मेस्त्री, आप्पा कुंभार, संकेत घाडी, डॉ. पप्पू मलगुंडे, दशातवतार कलाकार सिद्धेश कलिंगण, पंकज कलिंगण तसेच मिलिंद मेस्त्री, नृत्य कलाकार तन्वी पावसकर, निवेदक नीलेश गुरव, वायरमन वैभव ठाकूर, उद्योजक मंजुनाथ फडके, समाजसेवक संतोष कुडाळकर, पदवी परीक्षा उत्तीर्ण पियुष लाड, रुची नेरुरकर आदी २५ जणांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवयोद्धा गोविंदा पथक (परुळे) यांनी दहिहंडी फोडत १५ हजार रुपये पारितोषिक पटकावले. बक्षीस वितरण संजय नेरुरकर, प्रभात वालावलकर, नरेश नेरुरकर, गोपाळ नेरुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेसाठी कल्पेश मार्गी, सुधीर नेरुरकर, कृष्णा पाटकर, प्रवीण नेरुरकर, अमोल श्रृंगारे, पंडित घाडी, सतीश सावंत, किशोर सावंत, उमेश परब, दर्शन साऊळ, संतोष परब आदींनी परिश्रम घेतले. सरंबळ सरपंच रावजी कदम, नेरुर माजी सरपंच शेखर गावडे, आनंद नेरुरकर, अशोक पावसकर, बाळा पावसकर, संजय नेरुरकर, बाळा घाडी, दत्तात्रय देसाई, दाजी गावडे, प्रकाश साऊळ, बाळा धुरी आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.