- rat२८p१४.jpg-
२५N८७६८७
विलास राणे
‘मालगुंड तंटामुक्त’अध्यक्षपदी राणे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः मालगुंड ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच श्वेता खेऊर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये मालगुंड गावाच्या विकासकामाच्या दृष्टिकोनातून विविध ठराव घेण्यात आले. या वेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली. समिती अध्यक्षपदासाठी माजी कृषी अधिकारी विलास राणे यांचे नाव माजी सरपंच प्रकाश साळवी यांनी सुचवले. त्याला अतुल पाटील यांनी अनुमोदन दिले. राणे यांनी कृषी अधिकारी कार्यकाळात लोकांची उत्तमप्रकारे सेवा केली होती. त्यांचे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाटील, प्रकाश साळवी, रोहित मयेकर, राजू साळवी, साधना साळवी, अतुल पाटील यांनी अभिनंदन केले आहे.