Sangli Accident:'येळापूरचे माजी सरपंच मोटारीच्या धडकेत ठार'; मॉर्निंग वॉकवेळी घटना, रत्नागिरीतील कुटुंबीय जखमी
esakal August 29, 2025 02:45 PM

कोकरुड: कऱ्हाड - रत्नागिरी राज्य महामार्गावर येळापूर (ता. शिराळा) येथे सकाळी फिरायला गेले असता मोटारीने मागून धडक दिल्याने माजी सरपंच जयवंत यशवंत कोडोले (वय ४६) जागीच ठार, तर चालकासह मोटारीतील सात जण जखमी झाले.

Rambhau Gaikwad:ओबीसी नेते लक्ष्मण हाके जशास तसे उत्तर देणार: रामभाऊ गायकवाड;'मराठा आरक्षण जनजागृतीसाठी पंढरपुरातून रथयात्रा

ही घटना बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान घडली असून, याबाबतची फिर्याद सागर किसन कोडोले यांनी कोकरूड पोलिसांत दिली आहे. दरम्यान, मुंबईस्थित कुटुंबीय गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी जात होते.

कोकरूड पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मृत कोडोले बुधवारी सकाळी कऱ्हाड - रत्नागिरी मुख्य राज्यमहामार्गावर येळापूर हद्दीत फिरायला गेले होते. बाजू पट्टीवरून चालत असताना मागून भरधाव आलेल्या मोटार (एमएच ०४ डीएच ०३६९) ने त्यांना मागून जोराची धडक दिली व मोटार तशीच भरधाव वेगात शेतात घुसली. यामध्ये जयवंत कोडोले फरफटत गेल्याने जागीच ठार झाले.

Solapur News: साेलापूर नगरपरिषदेसाठी मंगळवेढ्यातून २०, बार्शीतून ८ हरकती; नगराध्यक्षांच्या आरक्षणाचा घेतला जातोय कानोसा

मोटारीतील संजय सीताराम मोरे (वय ५४), अंकिता संजय मोरे (३९), स्नेहल संजय मोरे (१७), आर्या संजय मोरे (१४), कनिष्का संजय मोरे (११), सारस संजय मोरे (९, सर्व रा. अंबरनाथ कल्याण जि. ठाणे) किरकोळ जखमी झाले आहेत. हे सर्वजण अंबरनाथहून त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ गावी निघाले होते. मोटार चालक परशुराम अनिल नकवाल याच्यावर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जयवंत जाधव करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.