Laser Eye Injury Risk: आजकाल सण-समारंभ असो किंवा लहान-मोठे कार्यक्रम, डीजेसोबत लेझर शो पाहायला मिळतोच. रंगीबेरंगी प्रकाश आणि धाग्यांसह होणारा हा नजारा मनोरंजक वाटतो, पण त्यामागे एक मोठा धोका लपलेला आहे, जो विशेषतः लहान मुलांच्या डोळ्यांसाठी गंभीर ठरू शकतो.
यंदा जर तुम्ही गणपतीच्या मिरवणुकीत लहान मुलांना घेऊन जाणार असाल, तर लेझर किरणांच्या संभाव्य परिणामांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
Bhadra Raj Yoga: सप्टेंबरमध्ये भद्र राजयोगामुळे मिथुनसह या 5 राशींना मिळणार यश, पैसा आणि प्रगती, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य लेझर म्हणजे काय?लेझर (Laser) हा एक अत्यंत तीव्र आणि केंद्रित प्रकाशाचा किरण असतो, जो एकाच दिशेने वेगाने जातो. डीजे शो, मिरवणुकीत वापरणाऱ्या लेझर लाइट्सची तीव्रता खूप जास्त असू शकते. जर हे किरण थेट डोळ्यात गेले, तर ते डोळ्याच्या अतिशय नाजूक भागाला म्हणजे नेत्रबिंदूला (Retina) हानी पोहोचवू शकतात.
लेझर किरणांचा डोळ्यावर होणारा परिणामडोळ्याचा मुख्य भाग, जेथे प्रकाश केंद्रित होतो, तो नेत्रबिंदू असतो. येथील पेशी प्रकाशशक्तीवर प्रतिक्रिया देतात आणि आपल्याला दिसणारी प्रतिमा तयार होण्यास मदत करतात. मात्र, लेझर किरणे या पेशींना नुकसान पोहोचवतात आणि हे नुकसान कायमस्वरूपी असू शकते. विशेषतः लहान मुलांना या धोक्याची जाणीव नसल्यामुळे ते लेझर लाइट्सकडे खूप वेळ थेट पाहतात. त्यामुळे त्यांचा डोळ्यांचा त्रास अधिक होण्याची शक्यता वाढते.
AAI Recruitment 2025: परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी! एअरपोर्ट प्राधिकरणात मेगा भरती सुरू; जाणून घ्या अर्ज कसा करावा? लेझर शोमध्ये मुलांमध्ये धोका का वाढतो?- लहान मुलांचा डोळा अजूनही संवेदनशील आणि विकासात असतो.
- त्यांना रंगीबेरंगी प्रकाश आकर्षक वाटतो आणि ते सहजपणे त्या किरणांकडे पाहतात.
- त्यांना लेझर किरणांचा दुष्परिणाम कळत नसतो.
- दीर्घकाळ लेझरला तोंड देणे डोळ्यांवर गंभीर वाईट परिणाम करू शकते.
धोकादायक लक्षणे- जर लेझर किरणांमुळे डोळ्यांवर परिणाम झाला असेल तर खालील लक्षणे दिसू शकतात:
- दिसण्यात अंधुकपणा किंवा धूसरपणा येणे
- डोळ्यांसमोर काळे किंवा पांढरे ठिपके दिसणे
- डोळ्यांना उजेड सहन न होणे
- डोळ्यात दुखणे किंवा कळवळ
- दृष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण
- या लक्षणांपैकी काहीही आढळल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
काय करावे- लहान मुलांना लेझर शोच्या जवळ नेणे टाळा.
- लेझर किरणांपासून संरक्षण करणारे गॉगल्स वापरणे शक्य असल्यास वापरा.
- लेझर उपकरणांपासून पुरेसा अंतर ठेवा.
- लेझर किरण डोळ्यात थेट जाणार नाही याची काळजी घ्या.
- मुलांना लेझरचा धोका समजावून सांगा.
लेझर किरणांच्या दृष्टीवर होणाऱ्या वाईट परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विशेषतः लहान मुलांना याची माहिती नसते. त्यांच्या दृष्टीचे कायमचे अधूपण होऊ शकते.
- डॉ. उमा प्रधान, ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ, सोलापूर