नवीन नियमः प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला काही बदल होतात, जे थेट तुमच्या खिशावर परिणाम करतात. यावेळीही 1 सप्टेंबरपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. ज्याचा तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. एलपीजी गॅस सिलिंडर, चांदी, क्रेडीट कार्डसंदर्बात हे बदल होणार आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआय येत्या 1 तारखेपासून त्यांच्या क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहे. बँकेने जाहीर केले आहे की सप्टेंबरपासून डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म, व्यापारी आणि सरकारी व्यवहार करण्यासाठी त्यांच्या काही क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट्स दिले जाणार नाहीत. याचा थेट परिणाम क्रेडिट कार्ड धारकांवर होईल.
चांदीच्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत केंद्र सरकार लवकरच महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे. याअंतर्गत, चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा एक नवीन नियम 1 सप्टेंबर 2025 पासून लागू केला जाऊ शकतो. सुरुवातीला हा नियम ऐच्छिक असेल, म्हणजेच ग्राहकांना हॉलमार्क केलेले किंवा हॉलमार्क नसलेले दागिने खरेदी करण्याचा पर्याय मिळेल.
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सुधारित केल्या जातात, काही महिन्यांत त्यांच्या किमती वाढतात आणि काही महिन्यांत किमती स्थिर राहतात आणि काही महिन्यांत त्या कमी देखील होतात. यावेळी देखील, एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 1 सप्टेंबर 2025 रोजी बदल दिसून येतील.
पोस्ट ऑफिसमध्ये मोठा बदल होणार आहे. नोंदणीकृत पोस्ट आता स्पीड पोस्टमध्ये विलीन केले जाईल. हा नवीन नियम 1 सप्टेंबर 2025 पासून लागू केला जाऊ शकतो. म्हणजेच, जर तुम्हाला 1 सप्टेंबर 2025 नंतर नोंदणीकृत पोस्ट पाठवायचे असेल तर ते फक्त स्पीड पोस्टद्वारेच पाठवले जाईल. आता नोंदणीकृत पोस्टची वेगळी सेवा राहणार नाही, सर्व पोस्ट स्पीड पोस्ट श्रेणीत येतील. त्याच वेळी, दर महिन्याप्रमाणे, सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमती देखील बदलू शकतात. त्यांचे दर काही काळासाठी निश्चित केले गेले होते, परंतु आता सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या किमती पुन्हा बदलू शकतात.
काही बँका एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भातील नवे नियम लागू करण्याच्या तयारीत आहेत. निश्चित व्यवहारांपेक्षा अधिक वेळा एटीएममधून पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल. डिजिटल व्यवहार करणं फायदेशीर ठरु शकतं.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा