RBI चा ‘या’ बँकेला मोठा दणका, तब्बल 45 लाख रुपयांचा ठोठावला दंड, नेमकं कारण काय?
Marathi August 31, 2025 01:25 AM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया: रिझर्व्ह बँकेने देशातील खासगी क्षेत्रातील बंधन बँकेला मोठा दंड ठोठावला आहे. आरबीआयने या बँकेला सुमारे 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) बंधन बँकेला 44.7 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारण बँकेने काही नियम आणि कायदे पाळले नाहीत. 31 मार्च 2024 पर्यंत बँकेची आर्थिक स्थिती तपासण्यासाठी वैधानिक तपासणी करण्यात आली होती. यानुसरा ही कारवाई करण्यात आली आहे.

या तपासणीत असे आढळून आले की बँकेने RBI च्या सूचनांचे पालन केले नाही. त्यानंतर, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का लावू नये अशी विचारणा करून बँकेला नोटीस पाठवण्यात आली. RBI ने म्हटले की बँकेने काही कर्मचाऱ्यांना कमिशन म्हणून पैसे दिले होते. बँकेने RBI च्या अनेक नियमांचे उल्लंघन केले, ज्यामुळे नियामक बँकेने खाजगी क्षेत्रातील बँकेवर हा दंड ठोठावला आहे.

बंधन बँकेविरुद्ध आरोप काय?

आरबीआयला त्यांच्या चौकशीत असे आढळून आले की बंधन बँकेने त्यांच्या काही खात्यांच्या डेटामध्ये मागील बाजूने छेडछाड केली आहे आणि सिस्टममधील ऑडिट ट्रेल्स/लॉग्स योग्यरित्या रेकॉर्ड केले नाहीत. ज्यामध्ये वापरकर्त्यांची माहिती कॅप्चर करायला हवी होती. रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की बंधन बँकेवर लावण्यात आलेला दंड केवळ आणि केवळ बँकेने कायदेशीर नियमांचे पालन न केल्यामुळे लावण्यात आला आहे. बँकेच्या ग्राहकांचा याशी थेट काहीही संबंध नाही. आरबीआयने असेही म्हटले आहे की याचा अर्थ असा नाही की बँकेच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारावर किंवा करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आरबीआयची ही कठोर कारवाई बँकिंग क्षेत्रासाठी एक मोठा संदेश मानली जात आहे. मध्यवर्ती बँक वारंवार सर्व बँका नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे योग्यरित्या पालन करतील याची खात्री करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून पारदर्शकता राखली जाईल आणि ग्राहकांचा विश्वास अबाधित राहील.

बंधन बँकेने RBI ने घालून दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही. त्यानंतर, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का लावू नये अशी विचारणा RBI ने बँकेला नोटीस पाठवूण केली होती. RBI ने म्हटले की बँकेने काही कर्मचाऱ्यांना कमिशन म्हणून पैसे दिले होते. बँकेने RBI च्या अनेक नियमांचे उल्लंघन केले होते. त्यामुळं ही कारवाई करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

New Cheque Payment Rules : चेक पेमेंट होणार झटपट, नवा नियम लागू; रिझर्व्ह बँकेकडून चेक ट्रान्सेक्शन सिस्टीममध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.