मांडवगण फराटा, ता. ३१ : जिजामाता महिला सहकारी बँक, पुणे या बँकेच्या मांडवगण फराटा (ता. शिरूर) शाखेने सन २०२४- २५ या आर्थिक वर्षात नेट एनपीए ० टक्के ठेवत कर्जवसुलीत उल्लेखनीय कामगिरी केली. नवी पेठ, पुणे येथे जिजामाता बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या शाखेला सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित केले.
बँकेच्या माजी उपाध्यक्षा सुरेखा शितोळे, संचालिका सुरेखा शेलार, रेखा बांदल, मनीषा कालेवार, जाकिरखान पठाण, व्यवस्थापकीय मंडळ सदस्य संग्राम गायकवाड यांच्या हस्ते व्यवस्थापक गोरख तिरखुंडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कर्ज वितरण व वसुलीमध्ये शाखेचे व्यवस्थापक गोरक्ष तिरखुंडे व सर्व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत मोलाचे योगदान दिले. बँकेच्या सभासदांना मागील वर्षी ८ टक्के लाभांश वाटप केला होता. यावर्षी तो ९ टक्क्यांपर्यंत वाढवून थेट सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याने सभासदांकडून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी बँकेच्या अध्यक्ष सुजाता जगताप, उपाध्यक्षा पूजा वांजळे, सहायक मुख्य अधिकारी लक्ष्मण गोडांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी उमाकांत मुंगी, शिरूर शहर राष्ट्रवादीचे शिरूर शहराध्यक्ष शरद कालेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शितोळे आदी उपस्थित होते.