नागपूर: मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारचे सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाला घाबरण्याचे कारण नाही, असा विश्वास गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज पत्रकार परिषदेतून ओबीसी समाजाला दिला.
Shashikant Shinde: आरक्षण देता येत नसेल, तर शरद पवारांकडे सत्ता द्या: प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाजरांगे यांच्या मुंबईतील आंदोलन सुरू केल्यानंतर ओबीसी समाजानेही नागपुरात साखळी उपोषण सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना भोयर म्हणाले की, राज्यात २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली. मराठा समाजालाही त्यांच्याच काळात आरक्षण देण्यात आलते. याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून मराठा समाजातील तरुणांना रोजगार, व्यवसायाच्या संधी फडणवीस यांनी उपलब्ध करून दिल्या. विविध योजना सुरू करून मराठा समाजाला लाभ दिला.
शरद पवार स्वतः सत्तेवर असताना त्यांनी आरक्षण दिले नाही. तेव्हा त्यांना घटनेत बदल करू शकतो हे समजले नाही का? हे आता मराठ्यांनाही समजले असून, शरद पवार यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करून जनभावना दुखावण्याचा प्रयत्न होत असल्याने आंदोलकांनी त्यांच्याविरोधातही निदर्शने केली. जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरविणाऱ्यांची नावे योग्य वेळी जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला. पत्रपरिषदेला आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, समीर मेघे, आमदार प्रताप अडसड, माजी खासदार रामदास तडस, माजी खा. सुनील मेंढे, माजी आ. सुधाकर कोहळे व इतर उपस्थित होते.
हैदराबाद गॅझेटची पडताळणी सुरूहैदराबाद गॅझेटची पडताळणी सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. आरक्षण देताना ते न्यायालयात टिकणार असंच द्यायचे आहे. त्यामुळे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांची असलेली आडमुठी भूमिका अयोग्य आहे. सरसकट ओबीसीतून कुठलेही दाखले दिल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे जरांगे यांनी सरकारशी चर्चेतून तोडगा काढावा, असा सल्लाही भोयर यांनी दिला.
Nagpur News: 'महाबोधी महाविहार मुक्तीसाठी संघटित एल्गार'; भंते सुरई ससाई, भंते आकाश लामा, भंते विनयाचार्य धम्ममंचावर एकत्र मुख्यमंत्र्यांना टार्गेट म्हणून तर आंदोलन नाही ना?भोयर म्हणाले, मराठा आरक्षणाची मागणी फार जुनी आहे. परंतु, जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतात त्याचवेळी हे आंदोलन मोठ्या प्रमाणात उफाळून येते. आंदोलनातून मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यात येत आहे. फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी तर हे आंदोलन उभे करण्यात येत नाही ना, अशी शंका त्यांनी उपस्थित केली.