मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेतली आहे. एमी फाऊंडेशसने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी होणार आहे.
जरांगे पाटलांनी आंदोलकांना समजवावं : विखे पाटील यांचा सल्लामराठा बांधव आझाद मैदानावर एकत्र येत असतील तर त्यात गैर काहीही नाही. मात्र इतर ठिकाणी जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत करणार असाल तर समाजाची बदनामी होतीय याचे भान ठेवा.
अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हा दाखलशिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रोसिटीअंतर्गत भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशिष्ट समाजाविषयी त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेण्यात आली होती.
सुप्रिया सुळे कसबा गणपतीच्या दर्शनालाखासदार सुप्रिया सुळे आज पुण्या दौऱ्यावर आहेत. आज कसबा गणपती दर्शनाला गेल्या आहेत. पुण्यातील मानाच्या गणपती सह इतर गणपतीचे घेणार दर्शन घेणार आहेत.
मराठा बांधवांना मदत करा,अमित ठाकरेंचे मनसैनिकांना आदेशमुंबई आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांना मदत करा, असे आदेश अमित ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा. औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.
मंत्रालयाबाहेरील सुरक्षेत मोठी वाढमनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाता आज चौथा दिवस आहे. मराठा आंदोलक मराठा आरक्षण प्रश्नी आक्रमक झाले आहेत. काही आंदोलकांनी मंत्रालयात घुसण्याचा देखील इशारा दिला आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या सुरक्षमध्ये वाढ करण्यात आली आहे.
जयंत पाटलांमध्ये हिंमत नाही - गोपीचंद पडळकरजयंत पाटलांनी जत मधून लोकसभेसाठी मुलाचं नाव पुढे केलं पण सर्वेत कुठं नाव येत नव्हतं. त्यानंतर हातकणंगले मधून मुलग्याचे नाव लोकसभेसाठी पुढे केलं पण तिकडे सुद्धा सर्व्हेत कुठेच नाव येत नव्हतं. दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन लढण्यासाठी धाडस लागतं ते धाडस जयंत पाटलाकडे नाही, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा चौथा दिवस, आजापसून पाणी सोडणारमनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. आजपासून आपण पाणीही घेणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे रविवारी रात्रीच सरकारकडून मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी हलचाली सुरू करण्यात आल्या होत्या. रविवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली.
सीएसएमटी जाणारे सर्व मार्ग बंद,मराठा आंदोलनामुळे मुंबई पोलिसांचा निर्णयमराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा बांधवाची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेत सीएसएमटी आणि मुंबई पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी आज (1 सप्टेंबर) बंद ठेवले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असल्याने आंदोलनाला आणखी गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.