Maratha Reservation: 'मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भान ठेवून बोलावे'; सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाचा इशारा, मुख्यमंत्र्यांना खूश करण्याचा प्रयत्न करु नये
esakal September 01, 2025 11:45 PM

सांगली : ‘भाजपचे ज्येष्ठ नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आंदोलनाच्या बाबतीत बेताल वक्तव्य न करता भान ठेवून बोलावे. मनोज जरांगेच्या आंदोलनाचा कसा यशस्वीरीत्या मार्ग काढता येईल, याचा अभ्यास करायचा. सोडून समाजामध्ये आणि इतर घटकांमध्ये परस्पर गैरसमज निर्माण होतील, अशी वक्तव्य करू नयेत; जिल्ह्यात फिरताना त्यांनी भान ठेवून बोलावे,’ असा इशारा मराठा क्रांती मोर्चा सांगलीच्या वतीने देण्यात आला आहे.

Solapur Airlines:'बंगळूर-सोलापूर-मुंबई विमानसेवा सप्टेंबरमध्येच'; स्टार एअरलाइन्सचं ठरलं; कर्मचारी,अधिकाऱ्यांसह विविध पदांची भरती

मराठा क्रांती मोर्चाने पत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वांचा रोष होत असताना तो स्वतःच्या अंगावर घेऊन मुख्यमंत्र्यांना खूश करण्याचा प्रयत्न मंत्री चंद्रकांत पाटील करत आहेत. त्यांचा हा उद्योग त्यांच्या अंगलट येईल, याची खातरजमा करूनच त्यांनी आपली भूमिका घ्यावी, असे म्हटले आहे.

यावेळी झालेल्या बैठकीत मुंबईत असणाऱ्या आंदोलकांसाठी काय मदत पाठवायची. त्यांच्यासाठी खाद्य पदार्थांसह अन्य आवश्यक साहित्य पाठविण्याचे नियोजन ठरले. समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

Maratha Reservation:'मराठा आंदोलनास गावागावांतून रसद'; अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक घरातून भाकरी, ठेचा, पाणी बॉटल मुंबईकडे रवाना

यावेळी सतीश साखळकर, शंभूराज काटकर, शिवाजी मोहिते, रुपेश मोकाशी, धनंजय वाघ, गजानन साळुंखे, सचिन देसाई, आनंद देसाई आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.