2025 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:57 वाजता सुरू होईल आणि 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1.26 पर्यंत असणार आहे. तर पूर्ण चंद्रग्रहण रात्री 11.42 ते 12.47 पर्यंत असणार आहे. यावेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत असतो. पूर्ण ग्रहणादरम्यान, चंद्र लाल होईल आणि हे दृश्य सुमारे 65 मिनिटे दिसणार आहे.
भारतात चंद्रग्रहण कोणत्या शहरांमध्ये दिसणार?
भारताव्यतिरिक्त, अंटार्क्टिका, पश्चिम प्रशांत महासागर, ऑस्ट्रेलिया, आशिया, हिंद महासागर, युरोप, पूर्व अटलांटिक महासागरात चंद्रग्रहण दिसेल. भारताबद्दल बोलायचे झाले तर हवामान स्वच्छ असल्यास भारतातील या 15 शहरांमध्ये चंद्रग्रहण स्पष्टपणे दिसणार आहे. भारतात हे चंद्रग्रहण दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, लखनौ, जयपूर, चंदीगड, अहमदाबाद, गुवाहाटी, पटना, भोपाळ आणि भुवनेश्वर.
पितृपक्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही ग्रहण म्हणजे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण
दरम्यान पितृपक्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही ग्रहण म्हणजे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण होत आहेत. पहिले चंद्रग्रहण सुरुवातीला होत आहे आणि नंतर दुसरे सूर्यग्रहण शेवटी होत आहे. पितृपक्ष सुरू होण्याच्या एक दिवस आधी, पौर्णिमेला पूर्ण चंद्रग्रहण होईल. त्याच वेळी, अमावस्येच्या दिवशी म्हणजेच पितृपक्षाच्या शेवटी सूर्यग्रहण होणार आहे. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.59 वाजता सूर्यग्रहण सुरू होणार आहे. मात्र भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे किमान भारतात तरी सूर्यग्रहणाबाबत सुतक इत्यादी नियमांचे पालन नाही केले तरी चालणार आहे.
सूतक काळ ग्रहणाच्या वेळेच्या 9 तास आधी सुरू होईल.
कोलकाता, गुवाहाटी सारख्या पूर्व भारतात चंद्रोदय लवकर झाल्यामुळे ग्रहणाची सुरुवात अधिक स्पष्टपणे पाहता येते. त्याच वेळी, मुंबई आणि अहमदाबाद सारख्या पश्चिम भारतात ग्रहण पूर्णपणे दिसेल, परंतु चंद्रोदयाची वेळ थोडी उशिरा असेल. हिंदू मान्यतेनुसार, सूतक काळ ग्रहणाच्या वेळेच्या 9 तास आधी सुरू होईल.
चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो का?
चंद्रग्रहणाबद्दल लोकांच्या मनात नेहमी एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे की हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पहावे की नाही? ग्रहण असं उघड्या डोळ्यांनी पाहणे अशुभ मानले जाते पण नक्की यामागे काय सत्य आहे जाणून घेऊयात. विज्ञानानुसार चंद्रग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते. तसेच उघड्या डोळ्यांनी चंद्रग्रहण पाहण्यात काहीही नुकसान नाही तसेच ते सूर्यग्रहणापेक्षा वेगळे असते. चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही चष्म्याची किंवा संरक्षक फिल्टरची आवश्यकता नसते आणि चंद्र उघड्या डोळ्यांनी पाहता येतो. तसेच संशोधकांच्या अभ्यासानुसार सूर्यग्रहणापेक्षा चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे कधीही सुरक्षित मानले जाते.
चंद्रग्रहण म्हणजे काय?
जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. या परिस्थितीमुळे पृथ्वीची सावली चंद्राच्या संपूर्ण प्रकाशाला व्यापते. जेव्हा चंद्र हळूहळू पृथ्वीच्या मागे येतो तेव्हा त्याचा रंग गडद होतो आणि तो तांब्याच्या रंगासारखा म्हणजेच गडद लाल दिसू लागतो. या रंगामुळे त्याला रेड ब्लड मूनही म्हणतात.